
उरण : उरणमध्ये लागोपाठ दुसर्या दिवशी कोरोनाचा भडका उडाला आहे. काल सापडलेल्या 21 कोरोना रुग्णांमध्ये भर पडून आज आणखी 27 जणांना लागण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात एकूण 56 वर कोरोनाबाधितांची संख्या पोहचली आहे.
मोठी बातमी : रायगड एक्स्प्रेस सुधीर तांडेल यांचे निधन
उरण तालुक्यातील करंजा सुरकीचा पाडा येथील कोरोना पॉझिटिव्ह लागण झालेल्या व्यक्तीमुळे 21 जणांना संसर्ग झाला होता. त्यांच्या संपर्कातील आणखी 33 जणांची चाचणी घेतली असता, त्यातील 27 जणांचा अहवाल सोमवारी (ता. 11) पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. करंजा येथील कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील 21 व्यक्तींचा अहवाल रविवारी (ता. 10) रोजी पॉझिटिव्ह आल्याने सर्वांना क्वांरटाईन करण्यात आले आहे. आज सोमवारी (ता. 11) 27 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
उरण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 56 झाली आहे, तर करंजा येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 49 झाली आहे. सध्या एकूण 51 रुग्णांवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच, उरण तालुक्यातील पाच रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
Will Uran be a red zone? in second day 27 new corona positive
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.