मद्य व्यवसायालाही नोटाबंदीचा फटका

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 नोव्हेंबर 2016

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद, काळा पैसा, खोट्या नोटा आदी गैरप्रकारांना रोखण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटाबंदीचा निर्णय घेतला. मात्र, याचा फटका मद्य व्यवसायालाही बसला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याची विक्री 25 टक्‍क्‍यांनी घटल्याची माहिती उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. देशी दारूच्या विक्रीत मात्र 5 ते 8 टक्‍के वाढ झाल्याचेही ते म्हणाले.

अवैध मद्य व्यवसायावर कठोर कारवाई
अवैध मद्याच्या व्यवसायावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले. एप्रिल ते ऑक्‍टोबर या कालावधीत एकूण 9 हजार 469 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 44 हजार 740 व्यक्‍तींना अटक करण्यात आली. 16 हजार 865 लिटर अवैध ताडी जप्त करण्यात आली, तर 487 वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. 19.83 कोटी रुपयांचा मुद्‌देमाल जप्त केल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

Web Title: Wine business loss by currency ban