हे सरकार आपल्याच आमदारांबाबत असुरक्षित; फडणवीसांची सरकारवर टीका

fadnvis
fadnvis

मुंबई: आज महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) पहिला दिवस पार पडला आहे. देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) आता पत्रकारांशी संवाद साधला आहे. त्यांनी भास्करराव जाधवांच्या अंगविक्षेपाचा मुद्दा, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याचा मुद्दा तसेच अध्यक्षपदाची निवडणूक गुप्तपणे न घेण्याबाबत वक्तव्ये केली आहेत.

fadnvis
ST Strike : कर्मचाऱ्यांविरोधात अवमानाची नोटीस काढण्यास हायकोर्टाचा नकार

त्यांनी म्हटलंय की, अध्यक्षपदाच्या निवडणुकी करता जो प्रस्ताव आज मांडण्यात आला त्यामधून हे सरकार आपल्याच आमदारांबाबत किती असुरक्षित आहे हे लक्षात आलं आहे. गेल्या साठ वर्षांपर्यंत अध्यक्षांची निवडणुक गुप्त मतदान पद्धतीनेच झाली आहे. पण 170 आमदार आमच्याकडे आहेत असं सांगणाऱ्या मविआला नियम बदलून ओपनपणे निडवणुक घेण्याची वेळ आलीये. त्यांना खात्री आहे की गुपतपणे निवडणूक झाली तर त्यांचेच आमदार या निवडणूकीत मतांद्वारे असंतोष व्यक्त करतील. त्यामुळे निवडणुकीची पद्धत बदलण्याची घाई या सरकारने केली आहे. हे सगळं इतक्या घाईगर्दीत केलंय की नियम समितीचा अहवाल तयार करताना भाजपच्या सदस्यांना निमंत्रण दिलंच नाही. सगळी पद्धत डावलून नियम 57 चा उपयोग करत घाईमध्ये हा अहवाल मंजूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

'वीज कनेक्शन कापल्याचा मुद्दा लावून धरु'

आज वीजेच्या संदर्भातील आमची लक्षवेधी ज्यावेळी आम्ही मांडली. सभागृहातील सर्व पक्षांचं याला समर्थन आलं. ज्याप्रकारे शेतकऱ्यांचे कनेक्शन कापण्यात येतंय. गावेच्या गावे अंधारात असून त्याबाबतचा मुद्दा आम्ही लावून धरला आहे. त्याच्यावर मंत्री नितीन राऊत यांनी आम्हाला राज्य सरकार पैसे देत नाही, त्यामुले आम्हाला कापावं लागतं, असं म्हटलं. यावर आम्ही उत्तर मागितलंय. वित्तमंत्री त्यावर उत्तर देतील असं सांगण्यात आलंय. ज्याप्रकारे शेतकऱ्यांचं वीज कापण्यात येतेय त्यावर आम्ही उद्याही आवाज उठवू, आमच्या काळात 11 हजार कोटी रुपये वीजमंडळाला दिले होते. मात्र, हे सरकार काही द्यायला तयार नसून वसूली करत आहे.त्याचा विरोध आम्ही यापुढे करत राहू, असं त्यांनी म्हटलंय.

fadnvis
कसलं भारी! चीनमध्ये सापडला तब्बल 7 कोटी वर्षांपूर्वीच्या अंड्यामधील बेबी डायनासोर

'चक्रीवादळानंतर दिलेलं पॅकेज फसवं'

आज महाराष्ट्रातील चक्रीवादळामध्ये जे प्रभावित झालेत त्याबबात दिलेल पॅकेज किती फसवं आहे, हे आता सरकारनेच मान्य केलंय. आता शेतकऱ्यांना किती मदत मिळालीय त्याची यादीच मी वाचून दाखवली आहे. नेमके पैसे किती दिले, हे देखील सरकारला नीट ठाऊक नही. त्यांचे दावे फोल आहेत. केंद्र सरकारकडून आलेलं पैसे देखील हे सरकार वाटू शकलेलं नाहीये. शेतकऱ्यांचे पंचनामे न करता त्यांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाहीये, असं त्यांनी म्हटलंय.

'मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याकडे जबाबदारी द्यावी'

मुख्यमंत्री आजारी असल्यावर आले नाहीत म्हणून आक्षेप घेतलेला नाही. ते आले नाहीत तरी अधिवेशन आम्ही पार पाडू. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडच्या जबाबदाऱ्या कुणाकडे तरी द्याव्यात. अधिवेशनाच्या काळात अशाप्रकारे जबाबदाऱ्या देता येतात. तसं ते करु शकतात.

'भास्करराव जाधवांनी समर्थन करणं वाईट'

या सभागृहाचा दुरुपयोग या ठिकाणी करण्यात आला. भास्करराव जाधव यांचं वर्तन आक्षेपार्ह आणि लज्जास्पद होतं. जे मोदी बोललेच नाहीत ते त्यांच्या तोंडी टाकण्यात आलं. असला कुठलाही व्हिडीओ कुणी देऊ शकलेलं नाही. मात्र, त्यांनी अंगविक्षेप करुन नक्कल करण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही आग्रह धरुन सभागृहाची माफी मागण्याचा आग्रह धरला. शेवटी त्यांना माफी मागावी लागली. कुणीही स्वताला सभागृहापेक्षा मोठं समजू नये. याप्रकारचं वर्तन सहन केलं जाणार नाही. 12 आमदारांच्या निलंबनाचा राग भाजपच्या मनात आहे, असं ते म्हणालेत. तुम्ही अंगविपेक्ष केलात तर खपवून घेणार नाही. अजूनही ते त्या गोष्टीचं समर्थन करतायत हे त्यापेक्षाही वाईट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com