कसलं भारी! चीनमध्ये सापडला तब्बल 7 कोटी वर्षांपूर्वीच्या अंड्यामधील बेबी डायनासोर

Baby Dinosaur Embryo Found In China
Baby Dinosaur Embryo Found In China

बीजिंग: बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीच्या (University of Birmingham) जीवाश्मशास्त्रज्ञांना (Palaeontologists) दक्षिण चीनमध्ये (China) एक अशी गोष्ट सापडलीय जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. चीनमध्ये अत्यंत दुर्मिळ असा डायनासोरचा भ्रूण एका जीवाश्म अंड्याच्या आत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

Baby Dinosaur Embryo Found In China
बटाटा कमी पडला, मॅक डोनाल्डला फटका बसला; जपानमध्ये फ्रेंज फ्राइजचा तुटवडा

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा डायनासोरचा गर्भ अजूनही उत्कृष्ट स्थितीत आहे. हा भ्रूण हजार-दोन हजार नव्हे तर तब्बल 72 दशलक्ष वर्षांपूर्वीचा आहे. या भ्रूणाला ‘बेबी यिंगलियांग’ असे नाव देण्यात आलंय. शियामेनमधील यिंगलियांग स्टोन नेचर हिस्ट्री म्युझियममधून हे नाव देण्यात आलंय. हा भ्रूण दक्षिण चीनमधील जिआंग्झी प्रांतातील गांझू शहरातील शाहे इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘हेकोऊ फॉर्मेशन’च्या खडकांच्या खाली सापडला आहे.

जिवाश्मशास्त्रज्ञांच्या मते, हे डायनासोरचे भ्रूण दात नसलेल्या चोचीच्या थेरोपॉडच्या प्रजातीशी संबंधित आहे. या प्रजातीलाच ओविराप्टोरोसॉर असं देखील म्हणतात. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सापडलेला भ्रूण आतापर्यंतचा सर्वात परिपूर्ण असा डायनासोरचा भ्रूण आहे. हा डायनासोरचा गर्भ अगदी एखाद्या पक्षाच्या गर्भासारखाच दिसून येतो. हा भ्रूण (embryo)विकासाच्या अवस्थेतील एखाद्या पक्ष्यांपेक्षा फारसा वेगळा दिसत नाही. किंबहुना वरकरणी तो डायनासोरपेक्षा (dinosaurs) एखाद्या पक्ष्याच्या भ्रूणाची आठवण करून देणारा आहे.

Baby Dinosaur Embryo Found In China
राजाची कविता घटस्फोटास कारणीभूत? प्रिन्सेसला 5540 कोटींची पोटगी

संशोधकांनी केलेल्या विश्लेषणाच्या आधारे असं दिसतं की, या भ्रूणाचा नमुना जवळ जवळ उबवलेला होता. या भ्रूणाचे डोके शरीराच्या खाली होते आणि दोन्ही बाजूला पाय ठेवून परत अंड्याच्या बोथट टोकाकडे डोके वळले होते. ओविराप्टोरोसॉर (oviraptorosaurs) हे 6.7-इंच लांब अंड्याच्या आत विकसित होऊ शकतात, त्यानंतर जन्माला आल्यावर डोक्यापासून शेपटीपर्यंत सुमारे 10.6 इंच लांब असू शकतात.

याबाबतच्या संशोधनाचे सह-लेखक आणि एडिनबर्ग विद्यापीठातील पृष्ठवंशीय जीवाश्मशास्त्रज्ञ स्टीव्ह ब्रुसेट यांनी एका निवेदनात म्हटलंय की, “मी पाहिलेला हा डायनासोरचा अंड्यातील गर्भ हा सर्वात सुंदर जीवाश्मांपैकी एक आहे. हा छोटा जन्माआधीचा डायनासोर त्याच्या अंड्यामध्ये असलेल्या नाजूकशा लहान पक्ष्यासारखा दिसतो. यावरुन आपल्याला असा पुरावा मिळतो की, आजच्या पक्ष्यांची वैशिष्ट्ये ही त्यांच्या डायनासोरच्या पूर्वजांमध्ये प्रथम विकसित झाल्याचे आपण म्हणू शकतो.”

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com