esakal | आनंदाची बातमी! हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने...
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदाची बातमी! हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने...

मुंबईत अनेक ठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेत. वरळी, धारावी यासारख्या भागात कोरोनानं कहर माजवला. मात्र अशातच मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

आनंदाची बातमी! हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीची वाटचाल प्रगतीच्या दिशेने...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


मुंबई- कोरोना व्हायरसनं राज्यात थैमान घातलं आहे.  मुंबईत या व्हायरसचा सर्वाधिक प्रार्दुभाव पाहायला मिळतो. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा उच्चांकी गाठताना दिसतो. मुंबईत अनेक ठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेत. वरळी, धारावी यासारख्या भागात कोरोनानं कहर माजवला. मात्र अशातच मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या धारावी भागात कोरोनाबाधित रुग्णांचा वेग मंदावला आहे. एवढंच काय तर गेल्या एका आठवड्यात धारावीत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 

सकारात्मक बातमी! कोरोना रुग्णांसाठी स्टीम थेरपी ठरतेय गुणकारी! वाचा बातमी सविस्तर

धारावीत शनिवारी केवळ नव्या 10 रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये आतापर्यंत 71 मृत्यू आणि 1,912 प्रकरणांची नोंद आहे. 30 मे रोजीपासून धारावीत एकही कोविड-19 रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही आहे. 6 जून आणि 7 जून रोजी या भागात अनुक्रमे फक्त 10 आणि 13 रुग्णांची नोंद आहे. धारावीमध्ये आतापर्यंत एकूण 1,912 रुग्ण आढळून आलेत. आतापर्यंत या भागात 71 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील बहुतेक एप्रिलमधले मृत्यू आहेत.

मनपा  अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, आम्ही धारावीवर बरेच लक्ष केंद्रित केले आहे आणि त्यामुळे चांगले निकाल पाहायला मिळालेत. 

29 एप्रिलला धारावीत विक्रमी 91 रुग्णांची नोंद झाली. 7 मे रोजी हा आकडा किरकोळ कमी होऊन 84 वर आला. जी-उत्तर प्रभागाचे सहाय्यक मनपा आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितलं की, टेस्ट कॅम्प आणि आयसोलेशन केल्यामुळे या भागात कोरोनाच्या घटनांमध्ये घट होण्याचं हे मुख्य कारण ठरलं. वेळेवर उपचार केल्यामुळे या भागातील मृत्यू दर कमी झाला. 

राज्यातील धार्मिक स्थळे तूर्तास बंदच; राज्य सरकारची अद्याप परवानगी नाही... 

धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा कमी करण्यासाठी एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात साई हॉस्पिटल (51 बेड), फॅमिली केअ(30 बेड) आणि प्रभात नर्सिंग होम (30 बेड)  अशी तीन रुग्णालये ताब्यात घेण्यात आली, असं दिघावकर यांनी सांगितलं. इतर काही रुग्णांना शीव रुग्णालयात पाठविण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. 

दिघावकर म्हणाले की, महापालिकेने आजूबाजूच्या वेगवेगळ्या जागा ताब्यात घेतल्या असून तिथे आयसोलेशन आणि क्वांरटाईन सारख्या सुविधांमध्ये रुपांतर करण्यात आलं आहे.  38 हजार लोकांना होम क्वांरटाईन करण्यात आलं. तर 8,500 लोकांना संस्थात्मक क्वांरटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली. 

मुंबईत नालेसफाई फक्त 40 टक्केच; भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला ठाकरे सरकारवर आरोप.

धारावीची लढाई

जी-उत्तर प्रभागातील प्रकरणे- 2,957
धारावीमधील प्रकरणे- 1,912
मृत्यू- 71
29 एप्रिलला रुग्ण संख्या- 91 
6 जूनला रुग्ण संख्या- 10
7 जूनला रुग्ण संख्या- 13
31 मे रोजीपासून एकही मृत्यू नाही.

loading image
go to top