Mumbai Woman Doctor Assaulted: सायन हॉस्पिटलमध्ये मद्यधुंद रुग्णाचा गोंधळ; नातेवाईकांसोबत मिळून महिला डॉक्टरला मारहाण

Doctor Assaulted By Drunk Patient: सायनमधील एका महिला डॉक्टरला मद्यधुंद रुग्णाने आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केली आहे. रविवारी सकाळी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
sion hospital
sion hospital
Updated on

मुंबई- कोलकात्यामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण तापलेलं आहे. अशातच मुंबईच्या सायन रुग्णालयात धक्कादायक घटना घडली आहे. सायनमधील एका महिला डॉक्टरला मद्यधुंद रुग्णाने आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केली आहे. रविवारी सकाळी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मद्याच्या अमलाखाली रुग्ण रुग्णालयात आला. त्याच्यासोबत ७-८ जण त्यांच्या नातेवाईक होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, पण रुग्णाने महिला डॉक्टरला मारहाण केली. डॉक्टर अक्षय मोरे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com