मुंबई : मेक्सिकोमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud
मुंबई : मेक्सिकोमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक

मुंबई : मेक्सिकोमध्ये नोकरी देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मेक्सिकोमध्ये (Mexico) चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याच्या अमिषानं एका व्यक्तीनं एका महिलेला 2 लाख रुपयांना गंडा (Money fraud) घातला. सौम्या शक्ती असे फसवले गेलेल्या महिलेचे नाव आहे. तर नितीन साबळे असे फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी साकिनाका पोलीस स्टेशनमध्ये (FIR in sakinaka police station) नितीन साबळे आणि त्याची सहकारी मोना या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (woman filed a complaint against culprits in job decoy fraud crime)

हेही वाचा: मुंबईच्या बिल्डरकडे मागितली २ कोटींची खंडणी ; बंगळुरुत आरोपीला अटक

सौम्या शक्ती या मुंबईच्या कलिनाच्या मर्सिडीज कंपनीमध्ये काम करतात. 2012 मध्ये त्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ इथं एका फायनान्स कंपनीत काम करत होत्या तेव्हा त्यांची ओळख नितीन साबळे याच्याशी झाली होती. ती नोकरी सोडल्यानंतर काही दिवस नितीन साबळे हा सौम्या शक्ती यांच्या संपर्कात होता, नंतर हळूहळू संंपर्क कमी झाला. त्यानंतर 2017 मध्ये पुन्हा नितीन साबळे सोशल मिडीयावरुन सौम्या यांच्या संपर्कात आला आणि त्यांचे एकमेकांशी बोलणे सुरु झाले. तो सध्या। मेक्सिकोत नोकरी करतो, आणि मुंबईतल़्या काही लोकांना त्याने इथे नोकरी मिळवून दिल्याची माहीती सौम्या यांना दिली.

काही दिवसांनी त्याने सौम्या यांना सांगितले की मेक्सिकोमध्ये एका ज्वेलरीच्या दुकानात कामासाठी माणसे हवी आहेत. त्यानंतर मेक्सिकोमध्ये येवून नोकरी करशील का असं त्यानं सौम्याला विचारले, त्यांनाही चांगल्या पगाराची नोकरी हवी होती, तेव्हा त्यांनी मेक्सिकोमध्ये जाण्यास संमती दर्शवली. त्यानंतर नोकरीसाठी लागणारे कागदपत्र दिल्यानंतर नितीनने व्हिसा आणि इमिग्रेशनसाठी 8 लाख रुपये लागतील असे सांगितले. पण सौम्याकडे तेवढे पैसे नसल्याने 2 लाखात काम होईल असं नितीनने सांगितलं. सौम्याची व्हॉटसअप व्हिडीओ कॉलवर मुलाखतही घेण्यात आली.

व्हिसाच्या पैशांसाठी मेक्सिकोतल्या एका बँकेचा अकाऊंटनंबर देण्यात आला. त्यावर सौम्याने दोन टप्यात पैसे पाठवले. व्हिसाचे कागदपत्र दिल्लीला मेक्सिको दुतावासात अडकले असल्याने सौम्याला नितीनने दिल्लीला जाण्यास सांगितले. दिल्लीला आठ दिवस राहुनही दुतावासात कागदपत्र मिळाले नाही, तेव्हा सौम्या पुन्हा मुंहईत आल्या, नितीनला कॉल केला, तर त्यांचे फोन बंद होते. अनेक दिवस त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे सौम्या शक्ती यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांनी साकिनाका पोलिस स्टेशनमध्ये नितीन साबळे आणि त्याची सहकारी मोना या दोघांच्या विरोधात भा द वीच्या कलम 34 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newscrime update
loading image
go to top