नवी मुंबई : इन्स्टाग्रामवरून एका अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करणे ऐरोलीत राहणाऱ्या ४६ वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले. या महिलेने ज्या अनोळखी व्यक्तीसोबत इन्स्टाग्रामवरून मैत्री केली, त्या व्यक्तीने वेगवेगळी कारणे सांगून महिलेला ५० लाख रुपये पाठवण्यास भाग पाडून तिची फसवणूक केली आहे.