'मला कोरोना व्हायरसचा संसर्ग झालाय' सांगितल्यावर बलात्कारी गेला पळून..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

तो आरोपी त्या रात्री तिच्या घरात घुसला. त्याच्याकडे पैसे नसल्याने तो चोरीच्या उद्देशाने घरात घुसला होता. मात्र घरात घुसल्यावर त्याने ती बेडरुमधे एकटीच असल्याचं पाहिलं. आणि त्याने आपला प्लान बदलला. ती एकटीच आहे पाहून त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही तरुणी हुशार होती. तिने पटकन खोकला येण्याची ऍक्टिंग केली आणि त्या नराधमाला, 'मी नुकतीच वूहान मधून आली आहे' मला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचं सांगितलं. हे ऐकताच हा इसम घाबरला आणि तात्काळ तिथून पळून गेला.   

या प्रकारानंतर या तरुणीने तात्काळ पोलिसांमध्ये धाव घेतली. सदर प्रकार पोलिसांना सांगितला. दरम्यान या प्रकरणी आता पोलिसांनी पुढील सूत्र हालवली आणि ताटाकल तपास सुरु केला. 

मोठी बातमी - नवी मुंबई राखण्यासाठी भाजपने आखला 'हा' प्लॅन... 

हा धक्कादायक प्रकार चीनमधल्या जिंगशॅन इथं घडलाय . 25 वर्षाचा आरोपी जायो हा या तरुणीच्या बेडरुममध्ये घुसला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या महिलेने स्वत: आजारी असल्याचं भासवत “मी आताच वुहानवरुन आले आहे. मला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं.

चीनमध्ये सर्व नागरिक सध्या मास्क लावून फिरतायत. अशात पोलिसांना या आरोपीला बेड्या ठोकण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अखेर या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

मोठी बातमी -  'आई अंकल येईल..'; आणि आईच्या पायाखालची जमीनच सरकली..

चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी आपले प्राण गमावलेत. संपूर्ण जगभरात कोरोनाची दहशत आहे. अशात या तरुणीने कठीण प्रसंगी शक्कल वापरल्याने तिच्यावरील तो कठीण प्रसंग टळलाय. 

woman scares rapist away in China by pretending she has coronavirusus infection

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman scares rapist away in China by pretending she has coronavirusus infection