
Crime News
ESakal
डोंबिवली : तू मला आवडतेस... माझ्या सोबत येतेस का...असे बोलून एका दारूड्याने फुले आणि गजरे विकणाऱ्या महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तथापी प्रसंगावधान राखून या महिलेने विजेच्या चपळाईने दोन हात करून दारूड्याच्या तावडीतून सुटका करवून घेतली. या दारूड्याला संतप्त जमावाने यथेच्छ बदडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा सारा प्रकार डोंबिवली पूर्वेकडील नेहरू रोडला असलेल्या भाजी मार्केटमध्ये घडला. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात श्रीकेश शिवशय चौबे (वय 46) याच्या विरोधात महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.