ठाणे : स्टेट बँकेत कायमस्वरूपी नोकरी लावतो असे, प्रलोभन दाखवत एका ३० वर्षीय तरुणीला डोंबिवलीतील त्रिकुटाने १३ लाखांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तेजस कनोजीया, किरण वाघमारे आणि रजनी दिकनोजीया या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून यात दोन महिलांचा समावेश आहे.