आणखी एक गंभीर घटना, उल्हासनगरमधील 'ती' कोरोना पॉझिटिव्ह महिला गेली होती सत्संगला, तिथं होती १५०० लोकं

आणखी एक गंभीर घटना, उल्हासनगरमधील 'ती' कोरोना पॉझिटिव्ह महिला गेली होती सत्संगला, तिथं होती १५०० लोकं

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वेगानं वाढत चालली आहे. आज राज्यात अजून ३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वरून ५२ वर पोहोचली आहे. मात्र लोकांकडून या बाबतीत हलगर्जीपणा केला जातोय. अशीच एक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. कोरोनाबाधित महिला १५०० लोकं असलेल्या सत्संगात गेली होती अशी माहिती आता समोर आलीये.

नक्की काय घडलं:
 
काल म्हणजेच १९ मार्चला उल्हासनगरची एक महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली होती. ही महिला ४ मार्चला दुबईवरून मुंबईत आली होती. त्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला होता. त्यानंतर त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  मात्र आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुबईवरून आल्यानंतर ही कोरोनाबाधित  महिला ८ मार्चला एका सत्संगात गेली होती. या सत्संगात तब्बल १५०० लोकांचा सहभाग होता. त्यामुळे ही महिला तिथे लोकांच्या संपर्कात आल्याची शक्यता आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.

काय होऊ शकतात परिणाम:

ही कोरोनाबाधित महिला त्या सत्संगात तब्बल १५०० लोकांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्कात आल्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जातेय. मुळात राज्य शासनाकडून सतत गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका किंवा तुम्ही बाहेरच्या देशातून आले असाल तर याची माहिती लपवू नका असं सांगितलं जात होतं. मात्र तरीही लोकं हलगर्जीपणा करताना दिसत आहेत. आता राज्याच्या आरोग्य विभागाकडून या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेतली जात आहे. सदर महिला कुणाकुणाच्या संपर्कात आली होती याची माहिती घेण्यासाठी एक टीम बनवण्यात आली आहे अशी माहिती आता समोर आलीये. याबाबत सर्वात आधी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली होती.   

woman who has COVID-19 attended satsang with 1500 people read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com