महाविकास आघडीत राष्ट्रवादीचं वर्चस्व; राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 मार्च 2020

मुंबई:  महाराष्ट्रातून राज्यसभेवर कोण जाणार याची जोरदार चर्चा होती. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी. महाविकास आघाडीकडून शिवसेना आणि काँग्रेसकडून एक-एक तर राष्ट्रवादीकडून एक अशी नावं निश्चित झाली होती. मात्र चौथी जागा कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबत तिढा निर्माण झाला होता. मात्र आता हा तिढा सुटला आहे. 

मुंबई:  महाराष्ट्रातून राज्यसभेवर कोण जाणार याची जोरदार चर्चा होती. याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी. महाविकास आघाडीकडून शिवसेना आणि काँग्रेसकडून एक-एक तर राष्ट्रवादीकडून एक अशी नावं निश्चित झाली होती. मात्र चौथी जागा कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबत तिढा निर्माण झाला होता. मात्र आता हा तिढा सुटला आहे. 

हेही वाचा: मोठ्या  नोकरी सोडून 'तो' देतोय प्लॅस्टिकमूक्त भारताचा संदेश 

राज्यसभेसाठी  शिवसेनेनं  प्रियांका चतुर्वेदी तर काँग्रेसनं राजीव सातव यांच्या शिक्कामोर्तब केलं आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान यांची नावं चर्चेत होती. त्यात शरद पवारांचं नाव नक्की समजलं जात होतं. मात्र महाविकास आघाडीकडून चौथ्या जागेसाठी कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला संधी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता हा तिढा सुटला आहे. राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीच्या खात्यात गेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचं वर्चस्व पुन्हा सिद्ध झालं आहे. 

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण १९ जागा आहेत. महाराष्ट्रातल्या २८८ आमदारांपैकी एका राज्यसभेच्या खासदाराच्या नियुक्तीसाठी ३७ आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. सध्या राज्यात भाजपचे १०५ आमदार आहेत. त्या आधारावर भाजप ३ खासदार राज्यसभेवर पाठवू शकतो. तर शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार सध्या विधानसभेत आहेत. या आधारावर इतर मित्रपक्षांच्या मदतीनं  महाविकास आघाडी ४ खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. त्यानुसार तिन्ही पक्ष आपला एक-एक सदस्य राज्यसभेत पाठवू शकतो, मात्र चौथा सदस्य कुणाचा असेल यावरुन संभ्रम निर्माण झाला होता. 

हेही वाचा: कोरोनाच्या धास्तीमुळे सॅनिटायझरचा तुटवडा... 

त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या चौथ्या जागेसाठी फौजिया खान यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झालं अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय.    

maharashtra politics NCP will get Fourth seat of rajyasabha 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra politics NCP will get Fourth seat of rajyasabha