मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून महिलेला केली अटक

विक्रम गायकवाड
Tuesday, 1 September 2020

स्वत:च्या पोटच्या मुलीचा वेश्यागमानासाठी 1 लाख 20 हजार रुपयांमध्ये सौदा करणाऱ्या महिलेला नेरुळ येथे अटक करण्यात आली आहे. 

नवी मुंबई: स्वत:च्या पोटच्या मुलीचा वेश्यागमानासाठी 1 लाख 20 हजार रुपयांमध्ये सौदा करणाऱ्या महिलेला नेरुळ येथे अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने सापळा रचून या महिलेला अटक केली आहे. या कारवाईत संबधित मुलीला पोलिसांनी सुधारगृहात पाठविले आहे.

मोठी बातमी! राज्यांतर्गत रेल्वे प्रवासी वाहतूक सेवेला हिरवा कंदील; उद्यापासून सुरू होणार बुकिंग

पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कारवाईत अटक केलेल्या महिलेचे नाव सोनम सिंग (वय 40) असून ती मीरा रोड येथील रहिवासी आहे. सोनम ला 18 वर्षाची मुलगी आहे. या मुलीचा वेश्यागमनासाठी तीेने दीड लाखाचा सौदा लावला होता. मुलगी पहिल्यांदाच शरिरसंबधांना समोरे जाणार असल्याने या महिलेने तीचा जादा बोली लावली होती अशी माहिती मिळाली आहे.

याप्रकरणाची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाल्यानंतर उपायुक्त प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड व त्यांच्या पथकाने या कारवाईसाठी बनावट ग्राहक तयार करुन सोनम सिंग ला सापळ्यात अडकवून अटक केली.  

'सत्ता विसर्जनाचा मुहूर्त त्यांनाच विचारून काढतो'; देवेंद्र फडणवीसांचा स्वकीयांनाच टोला

सोनमने पोलिसांच्या बनावट ग्राहकाला सोमवारी नेरुळच्या शिरवणे गावातील एका हॉटेलची रुम बुक केली होती त्यानंतर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोनम सिंग ही मीरा-भाईंदर येथून कारमधुन मुलीला घेऊन आल्यानंतर पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. यानंतर सोनमवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, मुलीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

women arrested from navi mumbai for pushing young girls into bad business


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women arrested from navi mumbai for pushing young girls into bad business