'रिलायन्स'च्या निकृष्ट कामाचा शेतकऱ्यांना फटका; शेतीची मोठी हानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udtare Village

रिलायन्स कंपनीने ठेका दिलेल्या संबंधित ग्लोबल कंपनीने पुणे-बंगळूर महामार्गाचे काम निकृष्ट केल्यामुळे उडतरे (ता. वाई) येथील शेतीचे मोठे नुकसान झाले आहेत.

'रिलायन्स'च्या निकृष्ट कामाचा शेतकऱ्यांना फटका; शेतीची मोठी हानी

सायगाव (सातारा) : रिलायन्स कंपनीने (Reliance Company) ठेका दिलेल्या संबंधित ग्लोबल कंपनीने (Global company) पुणे-बंगळूर महामार्गाचे (Pune-Bangalore Highway) काम निकृष्ट केल्यामुळे उडतरे (ता. वाई) येथे ओढ्याचे पात्र बदलल्याने शिवाजी बाबर यांच्या शेतातून (Farming) पाणी वाहून जाऊन शेतीचे मोठे नुकसान झाल्याने श्री. बाबर यांच्यासह अनेक शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्यामुळे शेतात आता कोणतेही पीक घेता येण्याची शक्यता मावळली आहे. (Major Damage To Farming In Udtare Village Due To Poor Work Of Reliance Company Satara Marathi News)

रस्ता खचल्यानंतर तब्बल दीड वर्षाने तेथे काम सुरू झाले. काम सुरू झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने शेताशेजारी असणाऱ्या ओढ्याचे पाणी कसे निघून जाईल, याचा विचार न करता केलेल्या कामाचा फटका शेतकऱ्यांना आता बसला आहे. लाखो रुपये खर्च करून सेवा रस्त्याच्याकडेने काँक्रीटमध्ये केलेल्या ओढ्याच्या बांधकामातून पाणी जातच नाही, तर ते पाणी शेतकऱ्यांच्या (Farmer) शेतातून वाहू लागले आहे. ज्या ठिकाणी गरज आहे, तिथे पाइप न टाकता नको त्या ठिकाणी टाकून चक्क ओढ्याचे पात्रच बदलले आहे. पावसाळ्यात (Heavy Rain) या ओढ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येत असते.

हेही वाचा: ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर; ऐन पावसाळ्यात मायणीत पुन्हा पाणीटंचाई

काही ठिकाणी नुसता मातीचा भराव टाकून ठेवल्याने मातीदेखील वाहून आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या पावसात जर परिस्थिती अशीच राहिली तर संपूर्ण शेती व त्यात असणारी थोड्या-फार प्रमाणातील पिके वाहून जाण्याचा धोका आहे. हे काम करून घेणाऱ्या ठेकेदारास अनेकदा समजावून सांगूनदेखील त्याने आमचे न ऐकता काम तसेच रेटून नेल्याचे येथील शेतकरी शिवाजी बाबर, नंदकुमार बाबर, दत्तात्रय बाबर, सयाजी बाबर, बाळासाहेब बाबर यांनी सांगितले.

हेही वाचा: VIDEO पाहा : 'आंदोलनाची नौटंकी करण्यापेक्षा भुजबळांनी सत्तेतून बाहेर पडावं'

ठेकेदारास आम्ही अनेकदा ओढ्याचे पात्र बदलू शकते, असे सांगितले होते. मात्र, तुम्हाला काही कळत नाही. आम्ही जे करतो ते योग्यच आहे, असे सांगून काम केल्याचा परिणाम शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्या झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण?

-शिवाजी बाबर, त्रस्त शेतकरी, उडतरे

Major Damage To Farming In Udtare Village Due To Poor Work Of Reliance Company Satara Marathi News

loading image
go to top