esakal | धक्कादायक! मालाडमध्ये डायलिसिस मशीन फुटल्यामुळे महिलेचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

सुलोचना यादव

धक्कादायक! मालाडमध्ये डायलिसिस मशीन फुटल्यामुळे महिलेचा मृत्यू

sakal_logo
By
रामनाथ दवणे, मुंबई

मुंबई: डायलिसिस मशीन (Dialysis Machine) फुटल्याने मालाड (malad) मध्ये राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू (women death) झाला आहे. सुलोचना यादव असे मृत महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या उत्तर प्रदेशच्या (uttar pradesh) रहिवासी आहेत. त्या मालाड पूर्वेला गोकुळनगर येथे एकट्याच राहत होत्या. २००६ पासून त्याचे डायलिसिस सुरू होते. सुलोचना यादव यांच्या पतीची पीठाची गिरणी होती. २००६ मध्ये पतीचे निधन झाल्यापासून त्या एकट्या राहत होत्या. (Women death due to Dialysis Machine burst in malad area)

किडनीच्या विकाराने ग्रस्त असल्यामुळे सुलोचना यांचे डायलासिस सुरु होते. घरातच त्यांनी मशीन घेतले होते. पण हे मशीन जुने झाल्याने बदलण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांनी हे डायलिसिस मशीन बदलले नव्हते.

हेही वाचा: पाणी साठवा! मुंबईत १३ जुलैला 'या' भागातील पाणी पुरवठा बंद किंवा कमी दाबाने होणार

काल सकाळी अचानक मशीन फुटल्याने सुलोचना जखमी झाल्या. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर याची माहिती कुरार पोलिसांना दिली. कुरार पोलिसांनी सुलोचनाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण उपचाराआधीच डॉक्टरांनी तपासल्यानंतर सुलोचना यांना मृत घोषित केले.

हेही वाचा: काळ आला होता पण वेळ नाही; दादर रेल्वे स्थानकातील थरारक प्रसंग

सुलोचनाच्या मृत्यूप्रकरणी कुरार पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. अंगावर संपूर्ण रक्त आल्याने सुलोचना यादव यांचा नेमका कशामुळे मृत्यू झालाय याची पोलीस चौकशी करत आहेत. डायलासिस मशीन फुटल्यामुळे सुलोचना यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे. स्थानिकांनी हत्येचा संशयही व्यक्त केला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर सुलोचनाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे कुरार पोलिसांकडून सांगण्यात येत आहे..

loading image