उंदरांसाठी बनवला विषारी टोमॅटो मात्र टोमॅटोमुळे महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

women death due to Poisonous tomato made for rat killing mumbai

उंदरांसाठी बनवला विषारी टोमॅटो मात्र टोमॅटोमुळे महिलेचा मृत्यू

मुंबई : मुंबईतील मड आयलंडवरील पास्कल वाडी येथे एका 35 वर्षीय महिलेने आपल्या घरात उंदीर मारण्यासाठी वापरलेल्या टोमॅटोचे सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती आणि नंतर तिला रुग्णालयात हलवण्यात आले जिथे तिला मृत घोषित केले.हा अपघाती मृत्यू असल्याने पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.

पोलिसांच्या तपासात माहिती मिळाली की मृताने तिच्या घरातील उंदीर मारण्यासाठी काही टोमॅटोना विष लावले होते. ती स्वयंपाक करण्यासाठी स्वयंपाकघरात गेली आणि नकळत तिने जेवणात विषारी टोमॅटोचा वापर केला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मृत महिलेला शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले जेथे तिचे शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणातील पुढील तपासासाठी तिची लाळ जतन करण्यात आली आहे. मालवणी पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Women Death Due To Poisonous Tomato Made For Rat Killing Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top