महिलांनो, रंगांचे दडपण घेऊ नका...

महिलांनो, रंगांचे दडपण घेऊ नका...

मुंबई - ‘अमक्‍या रंगाची साडी नेसली नाही तर मला पाप लागेल का?...’,  ‘माझ्याकडे साडी खरेदी करायला पैसेच नाहीत, तर दुसरी कोणती साडी नेसली तर चालेल का?...’ नवरात्रीचे नवरंग सोशल मीडियावरून आपल्यापर्यंत पोहोचले की असे प्रश्‍न सर्रास महिला जाणकारांना विचारत आहेत; मात्र महिलांनी रंगांचे दडपण घेऊ नका, त्याचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. हा केवळ मनोरंजनाचाच भाग असल्याचे जाणकार, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण आणि वेंगुर्ल्याचे वेदमूर्ती भूषण जोशी यांनी सांगितले. 

नवरात्र जवळ आली, की नऊ दिवस कोणत्या रंगांचे कपडे परिधान करावेत; हे सांगणारे संदेश व्हायरल होतात. मात्र ‘नवरात्रीच्या रंगांचा धर्मशास्त्राशी काही संबंध नसून पंचांगात ग्रहांच्या नावावरून कोणते वस्र परिधान करायचे याविषयी माहिती दिली आहे. केवळ समानतेच्या भावनेसाठी एकाच रंगाच्या साड्या परिधान करा, असे सोमण यांचे म्हणणे आहे; तर ‘या रंगांना धर्मात किंवा इतिहासात कोणतंही महत्त्व नसून काही मार्केटिंगवाल्यांनी केवळ धर्माच्या माथी मारलेली ही गोष्ट आहे. तो केवळ ज्योतिषशास्त्राचा भाग आहे,’ असे वेदमूर्ती भूषण जोशी म्हणाले.

नवरात्रीच्या रंगांचा धर्मशास्त्राशी काही संबंध नसून पंचांगात ग्रहांच्या नावावरून कोणते वस्र परिधान करायचे याविषयी माहिती दिली आहे. केवळ समानता आणि एकतेच्या भावनेसाठी हे रंग परिधान करा. त्याची सक्ती नको.
 - दा. कृ सोमण, पंचांगकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com