कळवा : धावत्या लोकलमध्ये बाटली फेकल्याने महिला जखमी

कळवा : धावत्या लोकलमध्ये बाटली फेकल्याने महिला जखमी

कळवा : ठाणे कळवादरम्यान कळवा खाडीपूलाजवळ धावत्या लोकलमध्ये बाटली फेकली गेली. त्यामुळे लोकलच्या दरवाज्याजवळ उभी असलेली महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. सध्या ही महिला प्रवाशी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार घेत आहे.

शुक्रवारी रात्री डोंबिवली देसले पाडा येथील आशा विनोद पाटील या ठाण्याहून डोंबिवली येथे जाणाऱ्या लोकलमधून आपल्या घरी जात होत्या. त्या दरवाजाच्या आतील भागात उभ्या होत्या. लोकल ठाणे कळवादरम्यान खाडी पूलाजवळ आली असता अचानक बाहेरून दारूची रिकामी बाटली तिच्या हातावर आदळली. ही बाटली आशा पाटील यांच्या हातावर व डोक्यावर लागल्याने गंभीर जखमी झाल्या.

प्रवाशांनी त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या हाताला आठ टाके पडले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत रेल्वे पोलिसांत अजून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com