

मुंबई - उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी खाकीतील सखी या अनोख्या उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत महिला प्रवाशांसाठी ' कोटो समुदाय अॅप ' सुरु केले आहे. या अँप मार्फत महिला प्रवाशांना लोकल ट्रेनमधून प्रवास करताना महिला सुरक्षेसंबंधीत भेडसवणारे प्रश्न, अनुचित, अप्रिय अनुभव या बाबत रेल्वे पोलीसांकडे व्यक्त होणार आहे.
खाकीतील सखी या अनोख्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केवळ महिलांसाठी तयार केलेले व सामाजिक समुदाय व्यासपीठ असलेले कोटो अॅप हे आता मुंबई लोहमार्ग पोलीसांबरोबर संयुक्तरीत्या काम करणार आहे. मुंबई रेल्वे पोलीस दलातील महिला अंमलदार यांना महिला रेल्वे प्रवाशांनी त्यांच्या 'सखी' (मैत्रीण) असे गृहीत धरुन लोकल ट्रेनमधून प्रवास करताना त्यांच्या सुरक्षेसंबंधीत भेडसवणारे प्रश्न/ अनुचित, अप्रिय अनुभव या बाबत रेल्वे पोलीसांकडे व्यक्त होणे हा मुख्य उद्देश आहे.
या उपक्रमाचा भाग म्हणून महिला प्रवाशांना मुंबई रेल्वे पोलिसांच्या महिला अमलदार यांचे समवेत मुक्त आणि सुरक्षित सवांद प्रस्थापित व्हावे यासाठी कोटो महिला सुरक्षा समुदाय, खाकीतील सखी या उपक्रमाला पाठिंबा देणार आहे.
महिला प्रवासी त्यांच्या लोकल प्रवासादरम्यान येणाऱ्या कोणत्याही समस्यांची तक्रार करण्यासाठी कोटो समुदाय अॅप वापरू शकतात. ते त्यांच्या समस्याबद्दल फोटो, व्हिडिओ आणि संदेश पोस्ट करू शकतात. त्यानंतर रेल्वे पोलीस त्याप्रमाणे त्वरित कारवाई त्यांना संबोधित करतील.
लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, यांनी सांगितले की, "कोटो सारख्या माध्यमाशी जोडून घेताना आम्हाला आनंद होत आहे, ज्यांची महिलांचे सुरक्षेबाबतची मूल्य आमच्यासारखीच आहेत. आमच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे शहरातील महिला प्रवाशांशी मजबूत संबंध निर्माण करणे आणि लोकल ट्रेनमधून प्रवास करताना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करताना त्या आमचा आधार घेऊ शकतात असा आत्मविश्वास निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. हा उपक्रम म्हणजे मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेसाठी आमच्या सततच्या प्रयत्नांचा विस्तार आहे.
कोटोच्या सह-संस्थापक अपर्णा आचरेकर यांनी सांगितले,की,"कोटो महिलांना कोणताही संकोच किंवा डिजिटल ट्रोलिंगशिवाय स्वतःला व्यक्त करण्यासाठी सुरक्षित वातावरण प्रदान करण्याची कल्पना करते. हा उपक्रम शहरातील महिलांमध्ये विश्वासाची भावना वाढवतो, ज्यांना मुंबई लोकलमध्ये प्रवास करताना सुरक्षेशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते, त्यांच्या समस्या त्यांनी मुंबई रेल्वे पोलीस महिला अंमलदारांना सांगाव्यात.
काय आहे कोटो अॅप?
कोटो ज्याचा अर्थ एकत्र या' आहे. हे Web3 च्या तत्त्वांवर आधारित, केवळ महिलांसाठी असलेले सामाजिक समुदाय अॅप आहे, जे अभिव्यक्ती, निर्मिती आणि समुदाय सक्षमता प्रदान करते. ही एक सुरक्षित ऑनलाइन जागा आहे जिथे स्त्रिया कोणतेही मूल्यमापन होण्याच्या किंवा ट्रोल होण्याच्या भीतीशिवाय कोणत्याही गोष्टीवर आणि प्रत्येक गोष्टीवर चर्चा करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.