Women's Day 2023 : महिला दिनाला रेल्वेत काळ्या फिती लावून महिलांचा प्रवास

लोकल मध्ये प्रवास करतानाही पुरुष प्रवाशांकडून धक्का देणे, अश्लील हावभाव, अश्लील बोलणे यांसारखे प्रकार सुरु असतात.
railway
railwayesakal

डोंबिवली - महिलांची सुरक्षितता हा मुद्दा आजही ऐरणीवर असून महिला कोठेही एकटीने प्रवास करताना धजावत आहेत. लोकल मध्ये प्रवास करतानाही पुरुष प्रवाशांकडून धक्का देणे, अश्लील हावभाव, अश्लील बोलणे यांसारखे प्रकार सुरु असतात.

railway
International womens day 2023 : स्त्रीयांचे आरोग्य आणि आव्हानं; वाचा एक्सपर्टचा सल्ला

मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकलमधील महिलांची वाढत जाणारी गर्दी व प्रवासातील महिलांची असुरक्षितता याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाचा महिला रेल्वे प्रवाशांनी निषेध केला आहे. येत्या 8 मार्च ला महिला प्रवासी काळ्या फिती लावून लोकलचा प्रवास करत प्रशासनाचा निषेध व्यक्त करणार असल्याची माहिती उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या सरचिटणीस लता अरगडे यांनी दिली.

लोकलमध्ये महिला प्रवाशांची वाढणारी संख्या, मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा तसेच प्रवासातील महिलांची असुरक्षितता याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रेल्वे प्रशासनाला जागे करण्यासाठी महिलांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

नुकतीच डोंबिवली येथे महिला प्रवाशांची एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ, डोंबिवली रेल्वे प्रवासी संघटना, कल्याण - कसारा रेल्वे प्रवासी संघटना व तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

railway
Women's Day Gifts : महिला दिनाला काय गिफ्ट देऊ? हे आहेत तुमच्यासाठी खास गॅजेट्स

या बैठकीत येत्या 8 मार्चला सर्व महिला प्रवाशांना काळी फीत लावून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिला प्रवासी संघटनांचे प्रतिनिधी आसनगांव, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली व ठाणे या स्टेशनवरील प्रवासी महिलांना काळ्या फितीचे वाटप करणार आहेत.

8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन हा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक क्षेत्रातील महिलांना समान संधी व अधिकार देणे याची आठवण करून देण्यासाठी आहे. तसेच लैंगिक समानता आणि महिलांच्या अधिकारांवर केंद्रीत आहे.

railway
Womens Day Special : स्त्री जाणिवांचा आरसा : स्त्रीकोश

पण पुरोगामी महाराष्ट्रातील व भारताची आर्थिक राजधानी म्हणून जगभरात ओळख असलेल्या मुंबई शहरातील उपनगरीय रेल्वे प्रवासी महिलांना आजही त्यांच्या समान हक्क व अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवासी महिलांची फार मोठ्या प्रमाणात अवहेलना होऊन तीचा रोजचा प्रवास हा असुरक्षित झालेला आहे.

पण दुर्दैवाने याकडे रेल्वे प्रशासन आणि शासन गांभिर्याने बघत नसल्याने निषेध व्यक्त करण्यासाठी महिला दिनी उपनगरीय महिला रेल्वे प्रवासी या काळ्या फिती लावून प्रवास करणार आहेत असे लता अरगडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com