जोगेश्‍वरीत मोलकरणीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

मुंबई - मोलकरणीने इमारतीच्या १८ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री जोगेश्‍वरीमध्ये घडली. ज्योती हरिश्‍चंद्र पाटेकर (वय १९) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. ज्योती मूळची रत्नागिरीतील होती. ती दीड वर्षापासून खासगी बॅंकेतील एका अधिकाऱ्याच्या घरी मुलीला सांभाळत होती. १५ दिवसांपूर्वीच तिथे दुसऱ्या तरुणीला कामाला ठेवण्यात आले होते. ज्योतीच्या कामाबाबत तक्रारी होत्या. जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. पोिलसांनी तिच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवले आहेत.

Web Title: women suicide in Jogeshwari

टॅग्स