

Kalyan-Dombivli Municipal Elections See Surge of Women Aspirants
Sakal
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी रणसंग्रामात महिला उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर शड्डू ठोकला आहे. एकूण १२२ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत तब्बल २२४ महिला उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. विशेष म्हणजे, मतदानापूर्वीच २० उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, त्यामध्ये १२ महिला उमेदवारांचा समावेश आहे.