esakal | ...प्रवेशद्वारावरचं मुख्यमंत्र्यांचं शुभेच्छापत्र; महिला कर्मचारी आनंदित
sakal

बोलून बातमी शोधा

...प्रवेशद्वारावरचं मुख्यमंत्र्यांचं शुभेच्छापत्र; महिला कर्मचारी आनंदित

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करणाऱ्या महिलांना वेगळाच अनुभव आला. मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक महिलेचे मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी शुभेच्छापत्र आणि फूल देऊन स्वागत करत होते. या वेळी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शुभेच्छापत्र पाहून महिला कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला.

...प्रवेशद्वारावरचं मुख्यमंत्र्यांचं शुभेच्छापत्र; महिला कर्मचारी आनंदित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मंत्रालयाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करणाऱ्या महिलांना वेगळाच अनुभव आला. मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक महिलेचे मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी शुभेच्छापत्र आणि फूल देऊन स्वागत करत होते. या वेळी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शुभेच्छापत्र पाहून महिला कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला. जागतिक महिलादिन या वर्षी रविवारी येत असल्याने शुक्रवारीच हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला.

ही बातमी वाचली का? ठाण्यात जंतुमिश्रित पाणी; तुमच्या पाण्यात तर नाही ना...

जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर फूल आणि शुभेच्छापत्र देऊन अनोख्या पद्धतीने महिलांचे स्वागत करण्यात आले. यासाठी मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर फूल आणि शुभेच्छापत्र घेऊन सज्ज होते. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून झालेल्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची मंत्रालयात जोरदार चर्चा सुरू होती. इतकी वर्षे काम केल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी पाठवलेले शुभेच्छापत्र बघितल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी आपल्याला मिळालेले शुभेच्छापत्र एकमेकांना वाचून दाखवून या महिला कर्मचारी आपला आनंद साजरा करताना दिसून आल्या; तर काही महिला कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांवर याबाबत आनंद व्यक्त केला.

ही बातमी वाचली का? दिवा परिसरात 24 तासांपासून वीज गायब

मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी महिला असोत किंवा कामानिमत्त सरकारदरबारी पायऱ्या झिजवणाऱ्या सर्वसाधारण महिला असोत, या सर्व महिलांचे या वेळी स्वागत करण्यात आले. त्यामुळे एरवी सरकारी कर्मचाऱ्यांकडून वाईट वागणूक अनुभवणाऱ्या सामान्य महिलांना हा धक्काच होता. दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासात महिलांचे योगदान महत्त्वाचे असून, तुमच्या सहकार्यामुळेच जनतेसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी यशस्वीपणे करू शकतो, असेही मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी महिलांना उद्देशून म्हटले आहे.

ही बातमी वाचली का? अखेर मासेखाऊ बचावला

ऐतिहासिक प्रेरणा
महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर नारीशक्तीचा सन्मान करत, जागतिक महिलादिनाच्या मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आनंदीबाई गोपाळ अशा अनेक थोर महिलांच्या कर्तृत्वाचा सुवर्णमय इतिहास आहे. नावीन्यपूर्ण काम करण्यासाठी हा इतिहास सदैव आपल्याला प्रेरित करत असतो, असा संदेशही मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रावर लिहिला आहे.