esakal | महिला बोलबच्चन टोळीचा पर्दाफाश; दागिने चोरीसाठी मालेगाव-मुंबई प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

महिला बोलबच्चन टोळीचा पर्दाफाश; दागिन्यांची चोरीसाठी मालेगाव-मुंबई प्रवास

ज्वेलर्स दुकानदारांना बोलण्यात गुंतवून दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश करण्यात भायखळा पोलिसांना यश आले आहे.

महिला बोलबच्चन टोळीचा पर्दाफाश; दागिने चोरीसाठी मालेगाव-मुंबई प्रवास

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : ज्वेलर्स दुकानदारांना बोलण्यात गुंतवून दागिन्यांची चोरी करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश करण्यात भायखळा पोलिसांना यश आले आहे. साजादा ऊर्फ अन्नू बशीर अन्सारी (30), नाजिया इजराइल शेख (30), नसरिन बशीर शेख (50), यास्मिन अझरुद्दीन खान (35) अशी या महिला आरोपींची नावे असून, त्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. 

नाट्यगृह आणि सिनेमागृह सुरू करण्याबाबत अमित देशमुख यांची महत्त्वाची माहिती


आरोपी महिला मालेगाव येथून प्रवास करत मुंबईतील ज्वेलर्स दुकानदारांना बोलण्यात गुंतवून दागिने चोरून पळ काढत असल्याचे समोर आले आहे. 5 सप्टेंबर रोजी या महिलांनी भायखळा येथील शिवम ज्वेलर्सचे मालक नीलेश जैन यांना अशाच प्रकारे गंडा घातला. सुरुवातीला तीन बुरखाधारी महिलांनी त्यांच्या दुकानात प्रवेश केला. यातील एका महिलेने नीलेश यांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने प्रत्येकी अडीच लाख रुपये किमतीच्या 24 ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या घेऊन पळ काढला. नीलेश यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी भायखळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी'; मुख्यमंत्र्यांसह कुटुंबीयांची पालिका पथकाकडून आरोग्य तपासणी

मालेगाव ते मुंबई प्रवास 
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून एका आरोपी महिलेचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यातच आरोपी महिला या मालेगाव येथून शुक्रवारी (ता. 2) मुंबई येथे येण्यासाठी कारने निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुलुंड टोलनाक्‍यावर पोलिसांच्या पथकाला एका कारमध्ये चार बुरखाधारी महिला संशयास्पद आढळून आल्या. या महिलांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबूली दिली आहे. या महिलांविरोधात महाराष्ट्र आणि इतर राज्यांत असे आठ गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत (ता. 7) पोलिस कोठडी सुनावली आहे. 
-----------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

loading image
go to top