esakal | भारतीय स्त्रीशक्तीतर्फे राष्ट्रीय लघुचित्रपट स्पर्धा | women's Empowerment
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai-University

भारतीय स्त्रीशक्तीतर्फे राष्ट्रीय लघुचित्रपट स्पर्धा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी (Women's Empowerment) कार्यरत असलेल्या भारतीय स्त्रीशक्ती या संघटनेने राष्ट्रीय लघुचित्रपट स्पर्धा (Movie competition) जाहीर केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) नाट्यकला प्रशिक्षण संस्थेच्या आणि विद्यार्थी विकास विभागाच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा: नवरात्रीनिमित्त दहिसरला लसीकरण

‘लिंग साचेबद्धतेला छेद’ हे स्पर्धेचे सूत्र असून लघुचित्रपटासाठी १)कोविड आणि बदलणारी भारतीय स्वयंपाक घरे २) किन्नरांना रस्त्यावर टाळ्या वाजवायला आवडत नाहीत, तुम्ही त्यांना काम द्याल का ३) शूर कोवियोद्धा ४) वाहक आसनावर स्त्रिया (नेतृत्व करणाऱ्या स्त्रिया) ५) घरून कामाचे नियोजन करताना कुटुंब हे पाच विषय ठरविलेले असून हिंदी, मराठी, इंग्लिश किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेत लघुपट बनवायचा आहे. मूकपट असला तरी चालणार आहे. लघुपटाची वेळमर्यादा पाच मिनिटे इतकी असायला हवी.

१८ ते २० वयोगटातील महिलांचा अ गट आणि ३० वर्षांवरील महिलांचा ब गट अशा दोन गटांत ही स्पर्धा होईल. ६ ऑक्टोबरपूर्वी नावनोंदणी करायची असून तीन नोव्हेंबरपर्यंत लघुपट पाठवायचे आहेत. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. नोंदणीसाठी भारतीय स्त्रीशक्तीच्या वेबसाईटवर किंवा ९००४६६८९६७ या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

loading image
go to top