
मुंबई: वेगवान गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर ही तंदुरुस्त झाली असून तिचा भारतीय महिला क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे. अनुभवी खेळाडू शेफाली वर्मा हिला मात्र वगळण्यात आले आहे. मायदेशात होत असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडकासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची मंगळवारी (ता. १९) निवड करण्यात आली. हरमनप्रीत कौर हिच्याकडे नेतृत्वपद अन् स्मृती मानधना हिच्याकडे उपकर्णधारपद कायम ठेवण्यात आले आहे.