'वर्क फ्रॉम होम'मुळे सायबर गुन्ह्यात मोठी वाढ; उकल करण्यात पोलिसांची क्षमता तोकडीच

अनिश पाटील
Saturday, 17 October 2020

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी कर्मचा-यांना घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे.

मुंबई - कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी कर्मचा-यांना घरूनच काम करण्याची परवानगी दिली आहे. परिणामी, तंत्रज्ञानाचा वापर वाढला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सायबर गुन्हा दाखल होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. पण तुलनेने गुन्ह्यांचा गुंता सोडवण्याच्या प्रमाणात मात्र घट झाली आहे.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि इक्बाल मिरचीच्या मालमत्तांचा होणार लिलाव

लॉकडाऊनच्या काळात प्रवासावर अनेक निर्बंध आल्यानंतर अनेक कंपन्यांनी घरूनच काम करण्याची मुभा कर्मचा-यांना दिली. याशिवाय विरंगुळा म्हणून मोबाईल व इतर तांत्रिक साधनांचा वापरही वाढला. चित्रपट, गाणी, ऑनलाईन गेम्स, व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉन्फन्सिंग आदीमध्ये वाढ झाली. यावर्षी ऑगस्टपर्यंत मुंबई पोलिसांकडे दाखल सायबर गुन्ह्यांचा विचार केल्यास त्यात काही शी वाढ झाली आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत मुंबईत 1485 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 1425 गुन्ह्यांची नोंद झाली होती.
यावर्षी 1485 पैकी केवळ 97 गुन्हे सोडवण्यात पोलिसांना यश आले आहे. दुसरीकडे गेल्यावर्षी 1425 पैकी 176 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते.

कॉंग्रेस आगामी BMC निवडणूक स्वतंत्र लढणार? पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबई अध्यक्ष बदलण्याचीही सुचना

गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण पाहिले, तर यावर्षी ते केवळ साडे सहा टक्के आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण 12.3 टक्के होते. सुमारे सहा टक्क्यांनी त्यात घट झाली आहे. सायबर गुन्ह्यांमध्ये आरोपी बहुदा पर राज्यातील असतात, काही प्रकरणांमध्ये परदेशातूनही फसवणूक होते. सध्या लॉकडाऊनमध्ये इतर राज्यात फिरून आरोपींचा शोध घेणे तेवढे सोपे राहिले नसल्याचे एका अधिका-याने सांगितले. यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत सोर्स टेंपरिंगचा एक गुन्हा, मॅन इन द मिड अटॅकचा(तोतयागिरी करून दुस-या खात्यावर पैसे मागवणे) एक गुन्हा, फिशिंगचे 22 गुन्हे, अश्लील ईमेल अथवा संदेश पाठवल्या बद्दल 133 गुन्हे, बनावट फेसबुक प्रोफाईल तयार केल्याप्रकरणी 18, क्रेडिट कार्ड फसवणूकीचे 241 गुन्हे व इतर 963 गुन्हे दाखल झाले आहेत.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work from home leads to large increase in cyber crime The capacity of the police to solve it is limited