देशातील पहिले कुर्ला येथील इलेक्ट्रिक पाॅवर सबस्टेशनचे पाडकाम

संपूर्ण भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
relve
relvesakal

मुंबई: संपूर्ण भारतीय रेल्वेचे विद्युतीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 2030 सालापर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याची योजना आखली आहे. यातच देशातील इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयू) शताब्दी साजरे करण्यासाठी तीन वर्षे राहिले आहेत. मात्र, देशातील सर्वात पहिले कुर्ला येथील इलेक्ट्रिक पाॅवर सबस्टेशन, ज्याच्याद्वारे देशातील पहिली इलेक्ट्रिक रेल्वे चालविली. त्याच पाॅवर सबस्टेशन पाडकाम सुरू आहे. त्यामुळे रेल्वेच्या इतिहासाच्या खुणा मिटल्या जात आहेत.

relve
त्यांचं गाणं रेकॉर्ड झालं की पुन्हा ऐकायच्या नाहीत, का माहितीये?; पाहा व्हिडिओ

देशातील पहिली इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयू) लोकल 3 फेब्रुवारी 1925 रोजी हार्बर मार्गावरून तत्कालीन बाॅम्बे व्हीटी आणि आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला दरम्यान धावली होती. ही पहिली लोकल चार डब्ब्यांची होती. 1904 सालापासून रेल्वेच्या विद्युतीकरणाच्या प्रक्रियेचा विचार केला जात असला तरी, 1925 मध्ये मध्य रेल्वेवरून पहिली इलेक्ट्रिक रेल्वे धावली. मात्र, मागील अनेक कालावधीपासून कुर्ला स्थानकाजवळील जुन्या डायरेक्ट करंट सबस्टेशन जवळ नवीन रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण सुरू आहे. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी उन्नत हार्बर रेल्वे मार्ग तयार करण्यासाठी ऐतिहासिक कुर्ला इलेक्ट्रिक पाॅवर सबस्टेशन पाडले जात आहे.

relve
इतिहासातील सर्वात उंच माणूस; आजपर्यंत कुणी त्यांचं रेकॉर्ड मोडू शकलं नाही

पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी कुर्ला येथील जुने आणि बंद डीसी सबस्टेशन पाडण्यात येत आहे. पाॅवर सबस्टेशनचा 25 टक्के भाग पाडण्यात येणार आहे. ज्यामधील लोडिंग बे भाग आहे. पाॅवर सब-स्टेशनमधील लोडिंग बेमधील जुनी क्रेन पुनर्संचयित करून हेरिटेज गॅलरीत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिकेचे काम पूर्णत्वास येत आहे. त्यामुळे कल्याण ते एलटीटीपर्यंत मेल-एक्स्प्रेसला स्वतंत्र मार्ग तयार झाला. तर, हार्बर रेल्वेवरील प्रवाशांचा लवकर व्हावा, गर्दीचे नियोजन करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने चुनाभट्टी ते टिळकनगर दरम्यान उन्नत मार्ग उभारण्यात येत आहे. कुर्ला स्थानकाच्या फलाट 7,8 जवळ या कामाने वेळ धरला आहे.

relve
लता मंगेशकर त्यांचं गाणं रेकॉर्ड झालं की पुन्हा ऐकायच्या नाहीत...का?

सध्या मध्य रेल्वे विभागाद्वारे प्रवाशांना मुख्य, हार्बर, ट्रान्सहार्बर आणि चौथा कॉरिडॉर (नेरुळ/बेलापूर-खारकोपर) या चार रेल्वे मार्गावर ईएमयूची सेवा देत आहे. मात्र, सर्वात पहिली ईएमयू लोकलची सर्वात 1925 सालापासून झाली. त्यावेळी 4 डब्यांची ईएमयू लोकल होती. तर,आता 15 डब्यांची ईएमयू लोकल धावत आहे. सुरुवातीच्या काळात मध्य रेल्वेच्या मार्गावर 150 लोकल फेऱ्या सुरू होत्या. तर, आता चारही रेल्वे मार्गावर 1 हजार 774 लोकल फेऱ्या धावत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com