ठेकेदारावर वचक नसल्याने कल्याण शीळ रोडचे काम संथगतीने सुरू; राजू पाटील

सर्वात जास्त बाधित मीच असल्याची मनसे आमदार राजू पाटील यांची खंत
kalyan shil road
kalyan shil road sakal

डोंबिवली : कल्याण शीळ रोडचे(kalyan-shil road) सिमेंट काँक्रीटीकरणचे काम गेले दोन वर्षे सुरू आहे. देसाई खाडी पर्यंत रस्त्याचे काम बऱ्यापैकी झाले आहे, मात्र पुढे अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. ठेकेदारावर(contractor) कोणाचाही वचक नसल्याने हे सुरू आहे. काटई टोल नाक्यामुळे होणारी वाहतूक वाहतूक कोंडी व संथ गतीने सुरू असलेली कामे यामुळे लोक आम्हाला येथे येऊ देणार नाहीत अशी परिस्थिती आहे. मी इथला स्थानिक आमदार आहे तरीही मीच जास्त बाधित आहे अशी खंत मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील(mla raju patil) यांनी व्यक्त केली.

कल्याण शीळ रोडचे काम हे अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पलावा ते देसाई खादीपर्यंत रस्त्याचे काम बऱ्यापैकी झालेले आहे, पुढे मात्र काम स्लो सुरू आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने उडणारा धुरळा, रस्त्याला पडू लागलेले खड्डे, गेलेले तडे यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. ठेकेदार अत्यंत बेशिस्त पद्धतीने काम करीत असून त्याच्यावर कोणाचेही बंधन नाही. यातील संबंधित लोक ही सत्ताधाऱ्यांचे भागीदार असल्याची चर्चा आहे. अभियंत्यांचा देखील धाक नसल्याने ठेकेदार कसेही काम करत आहे.

kalyan shil road
अजब कारभार....महामार्ग NHAIचा, दुरुस्ती बांधकाम विभागाकडे

काटई टोलवरील टोल बंद झाला, मात्र नाका काढला गेला नाही. यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याने तो हटविण्यात यावा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही. टोल बंद केला आहे,तर नाका देखील काढला गेला पाहिजे. यासाठी लवकरच हालचाली कराव्या लागतील, नाही तर लोक आम्हाला येथे येऊ देणार नाहीत. कोठे जायचे झाल्यास अर्धा अर्धा तास ट्राफिक मध्ये अडकून पडतो. मी इथला स्थानिक आमदार असून सर्वात जास्त बाधित मीच आहे. येत्या 5 ते 7 दिवसांत अधिकारी यांच्यासोबत रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात येईल, बघू काही फरक पडतो का? असेही आमदार पाटील म्हणाले.तसेच ग्रामपंचायती पासून नगरसेवकापर्यंत आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय घ्यायला येतात. खड्ड्यांचे देखील श्रेय घ्यावे, दिव्यातील रस्ता अर्धवट पडला आहे त्याचे हि श्रेय घ्यावे. असा टोला आमदार पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. यामध्ये टक्केवारीचे राजकारण होत असल्याने कामाचा दर्जा राखला जात नाही असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com