कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी अद्यापही युद्ध पातळीवर काम करणे गरजेचे; तज्ज्ञांचे मत

कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी अद्यापही युद्ध पातळीवर काम करणे गरजेचे; तज्ज्ञांचे मत


मुंबई  : देशपातळीवर कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या काही महिन्यांपासून घट झाली आहे. गेल्या महिन्याभरात राज्यात नविन निदान झालेल्या रुग्णांसह बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही दुपटीने वाढली असून सक्रिय रूग्णांची संख्या कमी झाली आहे.  राज्यात सध्याच्या घडीला सक्रिय रुग्णांचा आकडा एकूण 52,276    असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये अजूनही सक्रिय रुग्णांची संख्या अधिक असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. 
एकीकडे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94. 78 टक्के आहे. तर, मृत्यूदर 2.55 टक्के एवढा आहे. तर, राज्यात गुरुवारपर्यंत एकूण 51,111 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील ठाण्यापाठोपाठ पुणे, मुंबई आणि नागपूर मध्ये अधिक सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात 13,624  सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ ठाण्यात 10,162, मुंबईत 7759 आणि नागपूरात 4837 सक्रिय रुग्ण असून राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यांच्या सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे. 
दरम्यान, राज्यात कोरोनामुळे होणार्या मृत्यूंची संख्या ही कमी झाली असून त्याचा मृत्यू दर ही नियंत्रणात आहे. त्यामुळे, कोरोनाचा संसर्ग आणखी नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम करणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, राज्यातील सक्रिय रुग्णांपैकी 87 टक्के रुग्ण हे लक्षणविरहीत, सौम्य , बरे होणारे आहेत. तर, 7 टक्के हे आयसीयूमध्ये नसलेले पण ऑक्सिजन सपोर्ट वर असणारे आहेत. तर, 6 टक्के लोक गंभीर आहेत. त्यामुळे, जरी सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यात लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने ही एक दिलासादायक बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 2,25,449  एवढी असून 2.16 टक्के सक्रिय रुग्णांचा दर आहे. 

राज्याच्या तुलनेत मुंबईत सक्रिय रुग्णांची संख्या - 
मुंबईत सध्या 7 हजार 756 सक्रिय रुग्ण आहेत. यातील फक्त 500 रुग्ण गंभीर असु शकतील. इतर सगळे लक्षणविरहीत आणि सौम्य लक्षणे असलेले रुग्ण आहेत. त्यातील साधारणात: लक्षणविरहीत, 2000 सौम्य आणि लक्षणे असलेले आणि 500 गंभीर रुग्ण आहेत. त्यातील ही बरेचसे रुग्ण बरे होत आहेत. मुंबईतला मृत्यूदर कमी झाला आहे. इतर ठिकाणी पुणे, ठाणे, नागपूर आणि भारतात ही अर्न्याकुलमसह तीन ते चार ठिकाणी जास्त सक्रिय रुग्ण आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या जरी कमी झाली असली तरी कोरोना अजून गेलेला नाही. संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. लस उपलब्ध होत नाही तोपर्यत किमान तीन ते चार महिने मास्क घालून फिरले पाहिजे, बेफिकीरी अजिबात नको असा सल्ला राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी दिला आहे

Work still needs to be done on a war footing to control corona infection; Expert opinion

-------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com