
राज्यात शिवसेनेत पक्ष प्रवेशाची लाट सुरू असून आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे कल्याण लोकसभेतील प्रभावी पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या या प्रवेशामुळे कल्याण-डोंबिवली आणि अंबरनाथ विभागातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली आहे.