आता 'या' कर्मचाऱ्यांनाही लोकल प्रवासाची मुभा; ओळखपत्र सक्तीचे...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना लोकल रेल्वेने लवकरच प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

वडाळा : लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांना लोकल रेल्वेने लवकरच प्रवास करण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

ही बातमी वाचली का? मुंबईकर... मास्क लावा, नाहीतर हजार रुपये तयार ठेवा...

रेल्वे अधिकाऱ्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेक्रेटरी आर. पी. पैबीर यांना याबाबत दूरध्वनीद्वारे कळविले आहे. तसेच दोन दिवसात रेल्वे कडून लेखी परवानगी देण्यात येणार आहे.  याबाबत रेल्वे प्रशासनाने सर्व रेल्वे स्थानकांना मुंबई पोर्ट ट्रस्टच्या कामगारांनी ओळखपत्र पाहून प्रवास करण्याची परवानगी द्यावी असे कळविले आहे. त्यामुळे मुंबई पोर्ट ट्रस्टचे कामगार आता लोकल रेल्वेने प्रवास करू लागले आहेत. याची सर्व गोदी कामगारांनी नोंद घ्यावी असे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

ही बातमी वाचली का? मुंबईकरांनो 'याठिकाणी' जागोजागी आहे नाकाबंदी, विनाकारण बाहेर पडायचा विचारही करू नका

गोदी कामगारांना मुंबईमध्ये लोकल रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी मिळणेबाबत मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटीया, केंद्रीय गृहसचिव भल्ला,  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज,  ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी केरशी पारेख, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्था. लो. समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे मारुती विश्वासराव आदींनी प्रयत्न केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To the workers of Mumbai Port Trust Permission to travel by local train