कामगार कल्याण मंडळाच्या कामगारांना मिळणार थकबाकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

सहाव्या वेतन आयोगाबाबत न्यायालयाचे आदेश

सहाव्या वेतन आयोगाबाबत न्यायालयाचे आदेश

मुंबई - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ बाकी राहिलेल्या सहाव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम तीन महिन्यांत द्यावी, असा निकाल नुकताच उच्च न्यायालयाने दिला. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या थकीत रकमेचे मागणीपत्र कामगार विभागाच्या सचिवांना सादर करावे व त्यावर कामगार कल्याण आयुक्तांनी तातडीने निर्णय घ्यावा, असेही निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी जगदीश नाईक यांनी उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती. सहावा वेतन आयोग जानेवारी 2006 ऐवजी नोव्हेंबर 2012 पासून लागू केल्याने या कालावधीतील थकीत रक्कम मंडळाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली नव्हती. त्यासाठी कामगार मंडळातर्फे प्रयत्न सुरू होते; परंतु सरकारकडून आवश्‍यक परवानगी मिळत नसल्याने साडेचार वर्षे लोटल्यानंतरही पैसे मिळत नव्हते. थकबाकीचे पैसे मिळण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या 900 निवृत्त कर्मचाऱ्यांपैकी 210 जणांचे निधन झाले आहे, याकडे याचिकाकर्त्यांचे वकील ओमकार वारंगे आणि अमुल जावळे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. न्या. अनुप मोहता आणि न्या. रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

Web Title: Workers Welfare Board will be outstanding workers