धारावीत कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना प्रेरणादायीः जागतिक बँक

धारावीत कोरोनाला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना प्रेरणादायीः जागतिक बँक

मुंबईः कोरोनानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलं आहे. अशात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात झाला. त्यात मुंबईलाही कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. त्यातच आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीत कोरोनाचा प्रार्दुभाव मोठा होता. मात्र मुंबई पालिकेच्या यशस्वी प्रयत्नानंतर धारावीतील कोरोनाला रोखण्यात यश आले. 

जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ -WHO)नंतर आता जागतिक बँकेनंही  मुंबई महापालिकेच्या  धारावीच्या कोरोना पॅटर्नची दखल घेतली आहे.  कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना, खबरदारी तसेच नागरिकांचा सहभाग आणि पालिकेने चिकाटीने व्हायरस रोखण्यासाठी केलेले प्रयत्न हे धारावी पॅटर्नचे यश असल्याचे कौतुक जागतिक बँकेने केलेय. याबरोबर  कोरोना रोखण्यासाठी सर्वांनीच धारावीकडून धडे घेण्याचा सल्ला ऑक्सफर्ड विद्यापीठाने दिला.

काय म्हटलं जागतिक बँकेनं

स्थानविशिष्ट तोडगे, नागरिकांचा सहभाग, प्रयत्न आणि कष्ट यातून धारावीत हे यश साध्य झाल्याचं बँकेनं म्हटले आहे. तसंच भारताची व्यापारी राजधानी असलेल्या मुंबईतील धारावीचे क्षेत्रफळ २.५ चौरस किलोमीटर असून तेथील लोकसंख्या साडेसहा लाख आहे. तेथे लोकझोपडयात राहतात. अत्यंत कमी संख्येने सार्वनिक शौचालये तेथे आहेत. उघड्या गटारी असून अरुंद गल्ल्या आहेत. धारावीत कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनेही धारावीतील प्रयत्नांचे यापूर्वी जुलै महिन्यात कौतुक केले होते. मुंबईत ११ मार्च रोजी कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यांनतर तीन आठवड्यांनी म्हणजे एप्रिलमध्ये धारावीत बालिगा नगर परिसरात पहिला कोरोना रुग्ण सापडला. त्यानंतर जूनपर्यंत मोठ्या प्रमाणात धारावी परिसरात रुग्ण आढळून आले. धारावीचा परिसर हा झोपडपट्टी परिसर असल्यानं तिथे संसर्ग वाढत राहिल्यास संपूर्ण मुंबईत हा संसर्ग पसरण्याची भीती होती. त्यामुळे सावधगिरी बाळगत राज्य सरकार, पालिका, आरोग्य यंत्रणा तसंच लोकसहभाग आणि खासगी वैद्यकिय सेवेच्या मदतीनं धारावीत मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरु करण्यात आल्या. 

world bank praises dharavi the way bmc control covid 19 spread in slum

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com