esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

heart

जागतिक हृदय दिवस ; मरणोत्तर हृदय दानाने द्या नवजीवन

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : ताणतणाव, चुकीचा आहार आणि आरामदायी जीवनशैली (luxurious life) यांच्यामुळे आज समाजात हृदयविकार (heart decease) आणि त्यालाच लागून इतर बऱ्याच समस्या झपाट्याने वाढत आहेत. हृदयाचा आजारांपासून बचाव करण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी जगभरात 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन (World heart day) म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा: मुंबई : नवनवीन योजनांमुळे हमालांच्या पोटावर पाय

वेगवेगळ्या कारणांनी हृदय निकामी झालेल्या अनेकांना आजही हृदय मिळेल अशी आशा आहे. मुंबई सारख्या प्रमुख शहरात ही जवळपास 38 जणांना हृदयाची प्रतिक्षा आहे. अगदी लहान बाळापासून ते ज्येष्ठ वयोगटातील सर्वच लोक हृदयाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीने दिलेल्या माहितीनुसार, इतर अवयवांच्या तुलनेत हृदयासाठीची प्रतिक्षा यादी अत्यंत कमी आहे.

झेडटीसीसी कडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत  2015 पासून हृदय दान प्रत्यारोपणाला सुरुवात झाली. तेव्हापासून आतापर्यंत मुंबईत एकूण 155 हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्या आहेत. शिवाय, कोविड काळात ही हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया पार पडल्या. त्यासह कोविड महामारीच्या काळात 23 मार्च 2020 ते आतापर्यंत एकूण 20 हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

हेही वाचा: Indian Share Market : सेन्सेक्स 410 अंश घसरला

38 जणांना हवंय हृदय

इतर अवयवांच्या तुलनेत हृदया साठीची प्रतिक्षा यादी कमी आहे. मात्र, तरीही मुंबईतील 38 जण आजही हृदयाच्या प्रतिक्षेत आहेत. तसंच, सर्वच वयोगटातील लोक हृदयाच्या प्रतिक्षा यादीत आहे.

"2020 मध्ये अवयवदानाला प्रतिसाद कमी होता. पण, आता प्रतिसाद वाढला असून आणखी मोठ्या संख्येने लोकांची जनजागृती झाली पाहिजे आणि अवयवदानासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आता आयसीयूमध्ये मोठी जागा आहे, आयसीयूमध्ये ब्रेनडेड रुग्णांना दाखल केले जात आहे. लोकांमध्ये जनजागृती केली जात असून अनेकदा ब्रेनडेड रुग्णांचे नातेवाईक स्वत: पुढाकार घेतात आणि अवयवदान करतात."

-  डॉ. एस. के. माथुर , अध्यक्ष, झेडटीसीसीचे

loading image
go to top