

World Heart Day: 175 Deaths Daily Due to Heart Attacks in India; Increasing Risk Among Youth
sakal
विरार : राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या अहवालानुसार, भारतात दररोज १७५ लोकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होतो. २०१९ पासून अचानक मृत्यूंमध्ये मोठी वाढ झाली असून, २०२२ आणि २०२३ मध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.२०२२ मध्ये भारतात एकूण ५६,६५३ अचानक मृत्यूंपैकी ३२, ४१० मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहेत. तर २०२३ मध्ये ही संख्या ६३,६०९ एवढी झाली. यामध्ये ३५ हजार ६३७ मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाले. या प्रकरणांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि मेंदूतील रक्तस्राव यांचा समावेश होता.