जागतिक मलेरीया दिन : बॅक टू बेसिक जाण्याची गरज  - डॉ. अमृत गोरुले 

जागतिक मलेरीया दिन : बॅक टू बेसिक जाण्याची गरज  - डॉ. अमृत गोरुले 

मुंबई - 25 एप्रिल हा जागतिक हिवताप दिन यावेळी आपल्याला वेगळ्या दृष्टीने पहावा लागणार आहे. 25 एप्रिल 2019 रोजी Zero Malaria starts with me या घोषक्यासह मलेरिया निर्मुलनाच्या मोहीमेला सुरुवात झाली. आता कोविड 19 या जागतिक साथरोगाच्या विळख्यात जागतिक हिवताप दिनाचे औचित्य दडले आहे. समाजात हिवतापाबद्दल जनजागृती करण्याची ही योग्य वेळ आहे.हिवताप हा मुख्यत्वे फॉल्सिकेरम व व्हायवॅक्स या पॅरासाइटमुळे निर्माण होतो. व या पॅरासाइटची निर्मीती दलदलीच्या आणि अस्वच्छतेच्या ठिकाणी होते.

हिवतापाच्या आजाराने जगातील सुमारे 90 देशांमध्ये रौद्ररुप धारण केले आहे. मलेरिया या आजाराने भारताला केव्हाचेचं आपल्या कवेत घेतले आहे.देशातील  भौगोलिक विविधता आणि पर्जन्यमान हे मलेरीयाला वरदान ठरले आहे. त्यामुळे  देशाच्या एकुण  80 टक्के भूभागातील 95 टक्के भूभाग हे मलेरियाचे माहेरघर ठरलेत.यामध्ये 20 टक्के भागामध्ये आंध्रप्रदेश, छत्तिसगढ, गुजरात,झारखड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओरीसा, राजस्थान ही राज्ये येतात. तर पुर्वांलातील 7 राज्यात मलेरीयाचे एकुण 22 टक्के रुग्ण आढळतात. आपल्या देशात विदेशी पर्यटकांना हिपेटायटीस, धनुर्वात, विषमज्वराच्या लसी आणि  हिवतापाच्या गोळ्या सोबत घेऊन याव्या लागतात.

नॅशनल वेक्टर बोर्न डिसिज  कंट्रोल प्रोग्राम  या विभागाच्या देखरेखीखाली राज्य शासनाचा मलेरिया निर्मुलनाचा कार्यक्रम राबविला जातो. तर देशातील सुमारे 18 जिल्हांमध्ये  जागतिक बँकेच्या साह्याने मी मोहीम राबविली जाते.  ग्रामिण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र , अर्बन हेल्थ सेंटर, जिल्हा रुग्णालये,  मेडीकल कॉलेज आणि  हॉस्पीटल या तीन स्तरावर मलेरिया निर्मुलनाचे कार्यक्रम सुरु आहेत. देशातील 29 राज्य व  7  केंद्रशासित प्रदेशात या मोहीमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येतोय. 

मलेरिया हा कोविड सारखा घातक नसला तरी तो टाळता येण्यासारखा आणि औषधाने बरा करण्याजोगा आहे. मात्र त्याकडे गांभिर्याने पाहण्याची परिस्थिती सर्वांवर आली आहे. प्रत्येकाने सध्या उद्भवलेल्या परिस्थितीचे अवलोकन करुन आपल्या जिवनशैलीत सकारात्मक बदल घडवुन आणल्याशिवाय आता तरणोपाय नाही.

पंतप्रधानांनी कोविड 19 रुग्णांवर औषधउपचार करण्यास आयुर्वेद शास्त्रज्ञांना परवानगी दिली आहे. आपण ही बाब समजून घेतली पाहीजे. देशात अलोपॅथीच्या समांतर आयुर्वेद, होमियोपॅथी, नॅचरोपॅथी , युनानी, योग, निसर्गोपचार, क्रोमियोपॅथी या  आपल्या पांरपारीक चिकिस्तापध्दती आहेत. आयुष मत्रांलयाच्या माध्यमातून आयुर्वेदाला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यातला स्वस्थवृत्त हा विषय सर्व नागरिकांना माहिती असला पाहीजे. अगदी प्राथमिक शिक्षणातही या अभ्यासक्रमाचा अंतर्भाव करण्याची गरज आहे. 

जगात विवीध आजारांची निर्मीती होत असतांना,  पृथ्वी, वायु ,आप, तेज व आकाश या पाच भौतिक मुलतत्वांचा विचार करुन त्या नैसर्गिक दृष्टीकोनातून पांरपारिक मुल्यांचे जतन केले पाहिजे. जेव्हा हे तत्व दुषित होते किंवा केले जाते तेव्हा विषाणू व जिवाणूंची  निर्मीती होऊन ते मानवी जिवनाला नष्ट करण्यासाठी सज्ज होतात. त्यामुळेचे आता मृत्युनंतर मानवी शरीर जाळण्याचा  पध्दतीला जगभरातील अनेक राष्ट्रांनी आता स्विकार करायला सुरुवात केली आहे. दोन व्यक्तींमध्ये हस्तांदोलन करुन भेटीगाठीची सुरुवात होत असायची. त्याऐवजी दोन्ही व्यक्तीने किमान दोन फुट अंतर राखून हात जोडून नमस्कार घ्यावा. शरिरातील पाण्याचे योग्य प्रमाण राखण्यासाठी वांरवार पिण्यासाठी कोमट पाणी वापरावे. पहाटे उठून आपल्या दैनदिन कामाला सुरुवात करावी. या प्रथांचा स्विकार करुन त्याचा अवलंब करावा.  

साथीचे सर्व रोग स्वत:पासून कोसो दुर  ठेवण्याचा प्रयत्न मी करीत आहे,  अशी प्रतिज्ञा  केल्यास आपण कुठल्याही रोगावर आपण मात करु शकणार आहोत. मात्र त्यासाठी प्रत्येकाला आयुर्वेद शास्त्रातील दिनचर्या, ऋतुचर्या आणि नितीशास्त्र या मार्गदर्शक तत्वांचा खुबीने वापर करावा लागणार आहे. यासाठी शासनाने सकारात्मक विचार करावा. 

world maleria day we need to go back to basic says dr amrut gokhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com