Worli Fire
ESakal
मुंबई
Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर
Mumbai Fire News: वरळीमधून एक आगीची घटना समोर आली आहे. महाकाळी नगरमध्ये झोपड्यांना आग लागल्याचे दिसून आले आहे. यात अनेक झोपड्या जळाल्या आहेत. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
वरळीतील महाकाळी नगर, नारायण हार्डीकर रोड, वरळी डेपोसमोर रविवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. रात्री सुमारे ८.४५ वाजता ही आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत अनेक झोपडपट्ट्या जळाल्या आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे.

