बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना शून्य मतं | Election Results 2019

बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना शून्य मतं | Election Results 2019

वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यंदा निवडणुकीच्या रंगणात आहेत. अशातच आता सुरवातीचे कल येण्यास सुरवात झालीये. यात पहिल्या फेरी शेवटी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांना शून्य मतं मिळाली आहेत. आदित्य हे ठाकरे कुटुंबातील पहिले व्यक्ति आहेत जे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. 

मोठा गाजवजा करत आदित्य ठाकरे यांच्याविरोधात बिचुकले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अशातच मला हरवण्यासाठी शिवसेनेने पैसे वाटल्याचा आरोप बिचुकले यांनी केला होता.   

वरळी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात 1,49,067 पुरुष तर 1,16,024 महिला असे एकूण 2,65,091 इतके मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मुंबईतील सर्वाधिक ऑफलाईन नोंदणी होणारा मतदारसंघ वरळी हाच होता. 

Webtitle : worli vidhansabha constetuency early morning trends

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com