
डोंबिवली : कल्याण पश्चिमेला एका इडली डोसा सेंटरवर इडली वडा खाण्यासाठी गेलेल्या ग्राहकाच्या इडली वड्यात मध्ये चक्क अळी पडल्याची घटना घडली आहे. यामुळे संतापलेल्या ग्राहकाने याविषयी दुकानदाराकडे तक्रार केली. तक्रार केल्यावर दुकानदाराने ग्राहकाला मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पालिकेने दुकानातील सामान हे जप्त केले आहे. तर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.