

worms found in NMMC Canteen food
ESakal
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील भोजनालयात (कॅन्टीन) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुपारच्या जेवणासाठी आलेल्या एका महिलेच्या बटाटेवड्यात चक्क पांढऱ्या रंगाची जिवंत अळी आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे पालिकेच्या भोजनालयातील स्वच्छतेवर आणि अन्नाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु ही अळी वड्यातील नसून भाजीपाल्यावर असणारी आहे. वड्याच्या शेजारी ठेवलेल्या भाजीपाल्यावरून आल्याचे स्पष्टीकरण कॅन्टीन चालकाने दिले आहे.