मोखाडा - निसर्ग परिसंस्थेतून घुबड पक्षी दुर्मिळ होतं अहे. रस्त्याच्या कडेला वेदनेने व्हिवळत असलेले जखमी घुबड पक्षीप्रेमी तथा मोहिते महाविद्यालयाचे प्राध्यापक नवनाथ शिंगवे यांना आढळले. त्यांनी या घुबडाला वनविभागाकडे सुरक्षित सुपूर्द करून जीवदान दिले आहे. वन विभागाच्या वतीने मुलुंड येथील रेस्क्यू असोसिएशन वेल्फेअर ( RAWW ) येथे सुरक्षित उपचारासाठी घुबडाला दाखल करण्यात आले आहे.