महाराष्ट्र दिनी चिखले येथे रंगली कुस्तीची दंगल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

वाडा : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमीत्त चिखले येथे कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव, सांगली, नाशिक, मुंबईसह पालघर व ठाणे जिल्ह्यातील कुस्ती मल्लांनी मोठ्या संख्येने या स्पर्धांसाठी हजेरी लावली होती. नव्या पीढीला कुस्तीची ओळख व्हावी, ग्रामीण कुस्ती टिकावी व फुलावी यासाठी दरवर्षी या स्पर्धांचे आयोजन ग्रामस्थ मंडळाच्या वतीने केले जाते. यावेळी विद्युत वितरण कंपनीचे निवृत्त कर्मचारी देविदास पाटील यांचा गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

कुस्ती स्पर्धांमध्ये पुरूष गटात प्रथम पारितोषिक गोरेगाव येथील सत्यवान चव्हाण, द्वितीय पारितोषिक मंगेश पाटील भिवंडी तर तृतीय पारितोषिक भूषण राऊत अनगांव यांनी पटकावले. तर महिला गटात वाडा येथील नेहा गायकर प्रथम विजेती व जळगांवची कर्णिका सुर्यवंशी उपविजेती ठरली. संपूर्ण स्पर्धेत 114 कुस्त्या झाल्या. विजयी मल्लांना रोख रक्कम व चषक देण्यात आले. 

कार्यक्रमासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, नरेश आकरे, महेंद्र ठाकरे, डाॅ. गिरीश चौधरी, निलेश पडवले, राजू देसले, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनिल पाटील, कुस्ती असोसिएशनचे तालुकाध्यक्ष योगेश पाटील, कुस्ती प्रशिक्षक संभाजी सावंत, युवराज ठाकरे, डाॅ. भाई वलटे, रंजन पाटील, हेमंत सोनावणे, प्रमोद पाटील  नरेश पाटील, आदि मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपसरपंच नंदकुमार पाटील, शंकर गुरूजी पाटील, स्वप्नील पाटील, जाऊ पाटील, बाळू खंडागळे, सुभाष पाटील, रोहिदास पाटील,अनंता पाटील  यांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: wrestling at chikhale wada