
मुंबई, 24 : मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण दरम्यान १७ डिसेंबरपासून एसी लोकल सुरु केली. मात्र, एसी लोकलच्या उदघाटनाची घाई रेल्वे प्रशासनाने केली. सर्व प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची परवानगी नसताना एसी लोकल सुरु केली. त्यानंतर एसी लोकलचे वेळापत्रक अनियोजित बनविण्यात आले. परिणामी, या एसी लोकलमध्ये बोटावर मोजण्याइतकी प्रवासी असून सुरक्षा कर्मचारी स्वेटर खालून प्रवास करताना दिसून येत आहेत, अशी टीका प्रवासी संघटनांनी मांडली.
मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकलच्या 10 फेऱ्या सुरु केल्या. मागील आठवड्याभरात फक्त 96 तिकिटे आणि फक्त 26 पासची विक्री झाली आहे. यातून मध्य रेल्वेला 59 हजार 709 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. आधीच प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने एसी लोकल सुरु करायला नको होती. यामुळे एसी लोकल चालविण्यास आर्थिक खर्च वाढत जाईल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहे.
सर्व प्रवाशांना लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही. तरी, एसी लोकल सुरु करण्यात आली. परिणामी, एसी लोकलमध्ये प्रवाशांची संख्या कमी दिसून येत आहे. सर्व प्रवासी संघटनेकडून रेल्वे अधिकाऱ्यांना आताच्या स्थितीत एसी लोकल चालविण्यास नकार दिला होता. मात्र तरीही लोकल सुरु केली. एसी लोकलचे वेळापत्रक देखील नियोजनबद्ध बनविण्यात आला नाही असं सुभाष गुप्ता (अध्यक्ष, रेल यात्री परिषद) म्हणालेत.
एसी लोकल सुरु करताना सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करण्यात आला नाही. रेल्वे प्रशासनाने प्रथम श्रेणीतील प्रवाशांचा विचार करून एसी लोकल सुरु केली. एसी लोकलचे अनियोजित वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. परिणामी, प्रवाशांची संख्या कमी दिसून येत आहे. प्रवासी संघटनेच्या सूचना मध्य रेल्वे प्रशासनाने मागितल्या नाहीत.
- मधू कोटियन, सदस्य, विभागीय रेल्वे वापरकर्ता सल्लागार समिती
पश्चिम रेल्वे प्रशासनानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने ट्रान्स हार्बर मार्गावर एसी लोकलची सुरुवात केली. तर, मात्र सध्या ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू असलेली एसी लोकलमध्ये मागील दाेन महिन्यात 1 हजार 590 तिकिटे आणि 1 हजार 23 पासची विक्री झाली. त्यातून पश्चिम रेल्वेच्या तिजाेरीत 22 लाख 17 हजार 461 रुपये जमा झाले आहेत.
wrong timing to resume AC local on central railways very few people are using services
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.