यशवंत जाधव यांना महापौरपदाची संधी?

File Photo
File Photo

मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. जाधव हे शुक्रवारी स्थायी समिती अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन महापौरपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शक्‍यता आहे.

मुंबईच्या महापौरपदासाठी २२ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. महापालिका सभागृहात आवाजी पद्धतीने हे मतदान होते. या पदासाठी १८ नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. खुल्या वर्गासाठी आरक्षित असलेल्या महापौरपदावर शिवसेनेतून किमान डझनभर नगरसेवक आणि नगरसेविकांनी दावा केला होता. 

ज्येष्ठत्वाचा मुद्दा पुढे करत, तर काहींनी आतापर्यंत कोणतेच पद न मिळाल्याची सबब पुढे करत महापौरपदासाठी लॉबिंग सुरू केले होते; मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील यशवंत जाधव या स्पर्धेत सर्वात पुढे असल्याचे समजते.

जाधव यांच्या पत्नी व माजी नगरसेविका यामिनी जाधव भायखळा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. मुस्लिमबहुल मतदारसंघातून यापूर्वी कधीच शिवसेनेचा आमदार निवडून आला नव्हता.

पहिल्यांदाच ही जागा शिवसेनेने मिळवली आहे. त्यामुळे ‘मातोश्री’ त्यांच्यावर खुश असल्याने मुंबईतील सर्वात प्रतिष्ठेचे पदही त्यांना मिळण्याची शक्‍यता आहे. यशवंत जाधव हे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांना या पदाचा राजीनामा देऊन महापौरपदाची निवडणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे ते शुक्रवारी स्थायी समिती अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com