परिवहन महामंडळाच्या यशवंती मिनीबसला आता घरघर

अच्युत पाटील 
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

बोर्डी - महाराष्ट्रराज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 2911 मध्ये मोठ्या थाटात दाखल झालेल्या यशवंती मिनीबसला आता घरघर लागल्याचे चित्र दिसत आहे. इंजिनमध्ये होणारे वारंवार बिघाड महामंडळाला डोकेदुखी ठरत आहे. पालघर जिल्ह्यातील आगरातील पालघर-बोईसर मार्गवर धावणाऱ्या यशवंती मोठ्या प्रमाणात धुर ओकून प्रदुषणात भर पडत आहेत.

ग्रामीण भागातील चिंचोळ्या रस्त्यावर सहजगत्या फिरणाऱ्या यशवंतीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजही बोर्डी-डहाणू मार्गावर यशवंतीला पर्याय उपलब्ध नाही. मात्र वारंवार होणारे यांत्रिक बिघाडामुळे यशवंती आता बेभरोशाची झाली असल्याचे मत प्रवासी व्यक्त करित असले तरीही एस. टी.च्या ताफ्यात मोठ्या गाड्या ऐवजी यशवंतीची जास्त गरज असल्याचे सांगत आहेत.

डहाणु आगरात सुरवातीला 9 यशवंती बसगाड्या देण्यात आल्या होत्या. कालांतरांने यशवंतीचा दुरुस्तीचा खर्च वाढला अल्प काळातच नव पैकी सात यशवंती बस भंगारात गेल्या. आता फक्त दोन गाड्या आगरात चालविल्या जात आहेत. या गाड्याना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नवीन गाड्या आल्यास ग्रामीण भागातील रस्त्यावर चांगला उपयोग करून घेता येईल असे वाहतुक व्यवस्थापक सुनील वाघ यांनी सांगितले.

Web Title: Yashwanti minibus is not working properly