येस बँक भ्रष्टाचार प्रकरण; बिल्डर संजय छाब्रिया यांना अटक |Yes Bank- DHFL money laundering case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yes bank corruption case Builder Sanjay Chhabria arrested mumbai
येस बँक भ्रष्टाचार प्रकरण; बिल्डर संजय छाब्रिया यांना अटक

येस बँक भ्रष्टाचार प्रकरण; बिल्डर संजय छाब्रिया यांना अटक

मुंबई : येस बँक- डीएचएफएल मनी लाँडरिंग प्रकरणात (Yes Bank- DHFL money laundering case) सीबीआयने (CBI) मुंबईस्थित विकासक संजय छाब्रिया यांना अटक केली आहे. शुक्रवारी त्यांना विशेष कोर्टापुढे हजर करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

रेडियस डेव्हलपर ही बांधकाम कंपनी छाब्रिया यांच्या मालकीची आहे. सीबीआय अनेक दिवसापासून संजय छाब्रिया यांच्या मागावर होती. फेब्रुवारी महिन्यात सीबीआयने छाब्रिया यांच्या सहा ठिकाणी छापे घातले होते.छाब्रिया यांची कंपनीन डीएचएफएलची सर्वात मोठी थकबाकीदार आहे. कंपनीला डीएचएफएलचे 3 हजार कोटीचे देणे बाकी आहे.सीबीआयने 2020 मध्ये यस बँक घोटाळा प्रकरणी यस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएलचे वाधवान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

Web Title: Yes Bank Corruption Case Builder Sanjay Chhabria Arrested Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top