टाटा समूहाचा पुन्हा एकदा पुढाकार, प्लाझ्मा थेरपीसाठी 10 कोटी, 100 व्हेटीलेटर्स, 20 रुग्णवाहिका

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

संकटकाळात मदतीसाठी नेहमीच पुढे असणाऱ्या टाटा उद्योग समूहाने कोरोना विरोधातील लढाईत देखील स्वतःला झोकून देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.

मुंबई : संकटकाळात मदतीसाठी नेहमीच पुढे असणाऱ्या टाटा उद्योग समूहाने कोरोना विरोधातील लढाईत देखील स्वतःला झोकून देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. टाटा समुहातर्फे मुंबई मनपाला प्लाझ्मा थेरपीसाठी 10 कोटी, 100 व्हेटीलेटर्स, 20 रुग्णवाहिका देण्यात आल्या. यावेळी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. समाजातील प्रत्येक घटक एकत्र येऊन जेव्हा संकटाशी मुकाबला करतो त्यावेळेस यश नक्की मिळते. त्याच जिद्दीने कोरोनाशी लढा देताना टाटा समुहासारख्या उद्योग संस्था शासनाच्या खांद्याला खांदा लावून लढा देत आहे. आपण कोरोनाच्या लढाईत नक्कीच विजयी होऊ, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केला. 

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी मुंबई मनपा आणि टाटा समुह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या प्लाझ्मा प्रकल्पांतर्गत टाटा समुहातर्फे महापालिकेला 20 रुग्णवाहिका, 100 व्हेंटिलेटर्स आणि 10 कोटींचे अर्थ सहाय्य मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मोठी बातमी - राज्यात ८ जुलैपासून हॉटेल्स आणि लॉज होणार सुरु, सरकारने दिली सशर्त परवानगी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते. कोरोना सारख्या संकटात अनेक संस्था, व्यक्ती सामाजिक जाणीवेतून पुढे आल्या आहेत. टाटा समुह सुरूवातीपासूनच राज्य शासनाच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा राहीला आहे. कोरोनाचे संकट संपविण्याच्या जिद्दीने आपण सर्वच उतरलो आहोत असे ठाकरे म्हणाले. शासनासोबत नागरीक आणि मोठे उद्योजक खांद्याला खांदा लावून लढत आहेत. सर्वच जण अविश्रांत मेहनत करीत आहेत त्यात यश आल्याशिवाय राहणार नाही, असे ही त्यांनी पुढे सांगितले.

कोरोना कळात पहिल्या दिवसापासून सहकार्यासाठी टाटा समुहाचा सहभाग राहिला आहे. आताही त्यांनी 20 रुग्णवाहिका, 100 व्हेंटीलेटर्स आणि प्लाझ्मा थेरपीसाठी 10 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य दिले आहे. खर तर हे साहित्य वापरण्याची वेळ येऊ नये अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो असे सांगत त्यांनी टाटा समुहाने केलेल्या मदतीबद्दल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आभार देखील मानले.

मोठी बातमी सॅनेटाईझर, एन 95 मास्क विक्रीबाबत राज्य सरकार घेणार मोठा निर्णय; वाचा सविस्तर..

कोरोनामुक्त होण्यासाठी निर्भयपणे पावले उचचलील जात आहे त्यामुळे महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मंत्री अस्लम शेख यांनी यावळी व्यक्त केला. यावेळी महापौर श्रीमती पेडणेकर, टाटा समुहाचे अध्यक्ष एन. चंद्रा यांनी मनोगत व्यक्त केले.

yet again help from tata group donates 10 crore for plasma therapy, 100 ventilators and 20 ambulance


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yet again help from tata group donates 10 crore for plasma therapy, 100 ventilators and 20 ambulance