राज्यभरात आजपासून ‘यिन’चा ‘एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

नवी मुंबई - भविष्यातील शिक्षणाच्या तसेच करिअरच्या संधी, बदलत्या तंत्रज्ञानाबाबत महाविद्यालयीन विद्यार्थी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठातर्फे १६ ते १८ मे या कालावधीत नवी मुंबईतील वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर समर युथ समिट होणार आहे. त्यानिमित्ताने वाशीसह राज्यात अनेक ठिकाणी ‘एज्युस्पायर ॲडमिशन एक्‍स्पो’ही भरवण्यात येणार आहे.

शिक्षणाच्या संधी, योग्य अभ्यासक्रमाची तसेच संस्थांची निवड कशी करावी, नवीन परीक्षा पद्धती, प्रवेश तसेच स्पर्धा परीक्षा, ग्लोबल एज्युकेशन, ॲनिमेशन, माध्यमे तसेच अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रम देणाऱ्या देशातील तसेच परदेशातील नामांकित शिक्षण संस्थांची माहिती विद्यार्थ्यांना या एक्‍स्पोमध्ये एकाच छताखाली मिळेल.

स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी या एक्‍स्पोचे मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी, पिंपरी असलेल्या या एक्‍स्पोचे पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, सृजन कॉलेज ऑफ डिझाईन, पुणे, सिमॅसिस इंटरनॅशनल इंटरडिसिप्लिनरी लर्निंग सेंटर (एसआयआयएलसी) आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस्‌, पुणे हे सहप्रायोजक आहेत. अरेना ॲनिमेशन पनवेल-अलिबाग, हॉटेल पल्लवी अविदा हे नवी मुंबई येथे होणाऱ्या एक्‍स्पोचे सहप्रायोजक आहेत.  

एक्‍स्पोची वैशिष्ट्ये
राज्याच्या विविध भागांतील ५०० हून अधिक नामांकित संस्थांचा सहभाग.
शिक्षण आणि करिअरबाबत मोफत मार्गदर्शन

विविध परीक्षांचे निकाल लागून करिअरच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची निवड करण्याच्या या काळात विद्यार्थी आणि पालकांसाठी हा एक्‍स्पो महत्त्वाचा ठरणार आहे.

या एक्‍स्पोच्या निमित्ताने उभारण्यात येणाऱ्या एक्‍स्पिरियन्स झोनमध्ये बदलत्या तंत्रज्ञानाचा मागोवा घेता येणार आहे. रोबो, नॅनो ड्रोन, व्हर्च्युअल रिॲलिटी, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, आयआरव्हीआर आदी तंत्रींचा अनुभव घेता येणार आहे.

Web Title: YIN Eduspire Admission Expo